Sunday, May 19, 2024
घरमानिनीHealthथायरॉईडचे संतुलन राखण्यासाठी 'ही' फळे खावीत

थायरॉईडचे संतुलन राखण्यासाठी ‘ही’ फळे खावीत

Subscribe

आजकाल बरेच जण हे थायरॉइडच्या समस्यांनी ग्रासले आहेत. ही समस्या मेटॅबॉलिझम क्रियेशी संबधित आहे. खरे पाहता, थायरॉईड ही आपल्या गळ्यात असलेली फुलपाखराच्या आकारातील ग्रंथी आहे. ही ग्रंथी थायरॉक्सिन हार्मोन तयार करते. जे शरीरातील मेटाबॉलिझमचा दर, वाढ आणि पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते.

Fruits

- Advertisement -

शरीरातील हा हार्मोन जर व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरात काही समस्या उद्भवू शकतात. जसे थायरॉईडमध्ये लठ्ठपणा येणे ही सामान्य बाब आहे. थायरॉइडवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयीची योग्य काळजी घेतली तर बऱ्याच प्रमाणात तुमची ही समस्या दूर होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, काही फळे खाल्यास थायरॉईडचे संतुलन राखण्यास मदत मिळते.

संत्री
थायरॉइडच्या रुग्णांसाठी संत्र्यांचे सेवन हे फायद्यचे आहे. नियमित संत्र्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासह फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टळते. थायरॉईड ग्रंथीतील सूज कमी करण्यासही मदत मिळते.

- Advertisement -

किवी
या रुग्णांनी अवश्य किवी खावा. किवीत ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटीऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात असतात. याने थायरॉईड हार्मोन्सवर नियंत्रण ठेवता येते.

केळी
केळ्यात फ्लेव्होनाईड्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. थायरॉईड ग्रथींसाठी महत्वाचे असणारे सेलेनियमसुद्धा केळ्यात असते.

सफरचंद
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन ए, फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. निरोगी थायरॉईड हार्मोनसाठी ‘व्हिटॅमिन ए’ महत्वाचे आहे.

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि क्रॅनबेरी
तुम्ही तुमच्या आहारात ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि क्रॅनबेरी यांचा समावेश करू शकता. थायरॉईड रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

 


हेही वाचा ; वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गूळाचा चहा पिणं आहे फायदेशीर

- Advertisment -

Manini