Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthप्रोसेस्ड फूड आणि फ्राईड पदार्थामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

प्रोसेस्ड फूड आणि फ्राईड पदार्थामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Subscribe

विविध प्रकारच्या फ्राईड आणि प्रोसेस्ड पदार्थाना हल्ली जास्त प्रमाणात पसंती देण्यात येते. लवकर आणि कमी वेळात तयार होणारे हे प्रक्रिया केलेले पदार्थ खायला अगदी चविष्ट असतात. मात्र, प्रोसेस्ड फूड आणि फ्राईड पदार्थामुळे व्यक्तीचे आतडे, हृदय आणि त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊयात, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, फ्राईड पदार्थ यामुळे कोणते दुष्परिणाम होतात.

त्वचेचे नुकसान होते –
साखर, अस्वास्थकार फॅट्स आणि प्रोसेस्ड फूड यामुळे त्वचेच्या आरोग्यावर अत्यंत नकारात्मक परिणाम होतात. या पदार्थाचे सेवन केल्याने मुरूम आणि जळजळ यासारख्या त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. उच्च ग्लायसेमिक असलेले अन्न, जसे की ,साखरयुक्त स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स इन्सुलिनची लेवल वाढवू शकते. ज्याने त्वचेतील सेबमचे उत्पादन सुरु होते. सेबमच्या वाढत्या प्रमाणामुळे छिद्र बंद होऊ शकतात. ज्याने तुम्हाला मुरुमांची समस्या जाणवते. यासह जंक फूडमुळे त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया आणि अकाली वृद्धत्व येऊ शकते. तसेच सुरकुत्या आणि बारीक रेषा चेहऱ्यावर दिसू लागतात.

- Advertisement -

हृदयाशी संबंधित आजार उदभवतात –
फ्राईड पदार्थ खाल्याने हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यासारख्या समस्या उद्भवतात. एका अभ्यासानुसार, दर आठवड्याला तळलेले २ मासे खाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. याउलट, फळे आणि भाज्यांनी समृद्ध असा आहार घेतल्यास हार्ट प्रोब्लमचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

- Advertisement -

पचनशक्तीवर परिणाम होतो –
जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात अस्वास्थकार फॅट्स, साखर आणि कृत्रिम पदार्थ असतात. ज्याच्या सेवनाने पचनशक्तीवर लक्षणीयरीत्या परिणाम होतो. जंक फूडच्या अतिसेवनानामुळे आतडयांमधील निरोगी बॅक्टेरियाची संतुलन बिघडू शकते. ज्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यासारख्या समस्या उध्दभवतात. याव्यतिरिक्त जास्त चरबीयुक्त आणि सिंग्ध पदार्थामुळे पचनक्रिया मंद होण्याची शक्यता अधिक असते.

ब्लड शुगर लेवल वाढते –
अनेक अभ्यासानुसार, फ्राईड पदार्थ खाल्याने टाईप २ डायबिटीसचा धोका निर्माण होतो. २००५ मध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून दोनदा जास्त प्रमाणात फास्ट फूड खातात त्यांना ब्लड शुगर वाढण्याचा धोका असतो.

वजन आणि मेटॅबॉलिझम प्रभावित होते –
तुमच्या शरीरावर जंक फूडचे परिणाम अत्यंत नकारत्मक असू शकतात, विशेषतः वजन आणि मेटॅबॉलिझम संदर्भात. जंक फूडचे नियमित सेवन, ज्यामध्ये सामन्यात अस्वास्थकार फॅट्स, साखर आणि रिकाम्या कॅलरी असतात. वजन वाढण्यास त्या महत्वपूर्ण योगदान देतात.

 

 

 


हेही वाचा : भुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

 

- Advertisment -

Manini