Wednesday, February 28, 2024
घरमानिनीHealthविश्वासघातामुळे मनावर होतात दीर्घ परिणाम

विश्वासघातामुळे मनावर होतात दीर्घ परिणाम

Subscribe

विश्वासघात हा अनेकदा जवळच्या व्यक्तीकडून होतो आणि तो जिव्हारी लागतो. कधीकधी विश्वासघातामुळे झालेल्या गोष्टी व्यक्ती वर्षानुवर्षे विसरत नाही. पण, विश्वासघातामुळे आपले मन मारण्याची किंवा भावना दाबून ठेवण्याची गरज नाही. अशा गोष्टी या आयुष्यात होतच असतात. त्या विसरून व्यक्तीने पुढे जाणे आणि आपले ध्येय साध्य करणे अत्यंत महत्वाचे असते. खरं तर, विश्वासघातामुळे मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत असतो. त्यामुळे व्यक्तीने त्यावर मात करणे गरजेचे असते.

विश्वाघातातुन सावरण्यासाठी टिप्स –

- Advertisement -

स्वतःला कमकुवत समजू नका – आयुष्यात अनेक चढ-उतार हे येतच असतात. अशाने काही व्यक्ती या लगेचच निराश होतात. पण, व्यक्तीने परिस्थितीला शरण न जाता, न घाबरता आव्हानांना तोंड द्यायला हवे. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या मजबूत व्हाल. तुमच्या आयुष्यातील समस्यांचे कारण शोधा. स्वतःला कमी समजू नका. झालेल्या गोष्टी विसरून पुढे जायला शिका.

भावनांवर ताबा मिळवा –
भूतकाळात घडलेली घटना एखाद्या व्यक्तीमध्ये राग, चिडचिड यासारख्या भावना निर्माण करते. यासाठी तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा मिळविणे गरजेचे आहे. एका घटनेमुळे तुमचे आयुष्य पणाला लागू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा.

- Advertisement -

पुरेशी झोप घ्या – कोणत्याही प्रकारच्या आघातातून सावरण्यासाठी स्वतःला रिलॅक्स ठेवणे आवश्यक आहे आणि यासाठी तुम्ही पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे. तुम्ही 8 ते 10 तासांची झोप घेतल्यास शरीरात वाढणारे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडू लागतात. परिणामी, शरीराला आराम मिळतो आणि मानसिक स्वास्थ्य नीट राहते.

मेडिटेशन अथवा ध्यान करा –
वारंवार मनात येणारे चुकीचे विचार दूर करणे गरजेचे असते. असे न केल्यास त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यातून बाहेर निघण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान करणे. दिवसातून 20 ते 25 मिनिटे ध्यानासाठी काढा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. या व्यायामाने श्वासोच्छवासावरील नियंत्रण वाढते. ध्यान केल्याने स्ट्रेसमुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत मिळते.

 

 


हेही वाचा : हृदयालाही असते डिटॉक्सची गरज

- Advertisment -

Manini