Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthआईचे मानसिक आरोग्य आणि मुलाचा विकास

आईचे मानसिक आरोग्य आणि मुलाचा विकास

Subscribe

आई आणि बाळाचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले असते. गर्भांत वाढणाऱ्या मुलांसाठीच नव्हे तर जन्मांनंतर बाळाच्या आरोग्यासाठी आईने निरोगी राहणे गरजेचे असते. विशेषतः आईच्या मानसिक आरोग्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आईच्या मानसिक तणावाचा परिणाम, प्रेगसीदरम्यान आणि नंतर मुलाच्या आरोग्यावर दिसून येतो. आईच्या मानसिक आरोग्याचा मुलाच्या वाढीवर लक्षणीय परिणाम होत असतो.

जरी प्रेगन्सीचा काळ आनंदाचा असला तरी शरीर आणि मनातील अचानक बदल मातेच्या मानसिक आरोग्यावर नकारत्मक परिणाम करू शकतात. जाणून घेऊयात, आईच्या मानसिक आरोग्याचा मुलाच्या विकासावर नक्की कसा परिणाम होतो?

- Advertisement -

वर्तवणुकीवर परिणाम –
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आईचे मुले अधिक तणावग्रस्त आणि वर्तवणूक संबंधित समस्यांनी ग्रस्त असू शकतात. आईच्या मानसिक आरोग्याचा घरातील वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परिणामी, मुलाच्या वाढीवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय मुलाच्या सुरक्षिततेच्या आणि विश्वासाच्या भावनेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

भावनिक बंधावर नकारात्मक परिणाम होतो –
आईच्या मानसिक स्थितीचा तिच्या मुलाशी असणाऱ्या भावनिक बंधावर परिणाम होतो. आईला जाणवणारे तणाव, स्ट्रेस आणि नैराश्य याचा आई आणि मुलाच्या नात्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

दीर्घकाळ टिकणारा परिणाम –
आईचे मानसिक आरोग्य आणि तिच्या मुलाची वाढ यांच्यात खोलवर संबंध असतो. मुलाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आईच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

प्रेगन्सीदरम्यान –
प्रेगन्सीदरम्यान लक्षणीयरीत्या आई आणि मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासह पालकांमधील चिंता आणि नैराश्य यामुळे पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकते. ज्यामुळे मुलामध्ये भविष्यात मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

स्ट्रेस –
जेव्हा मूल गर्भाशयात असते, तेव्हा त्यांना वारंवार स्ट्रेस हार्मोन्सचा सामना करावा लागतो, याचाच अर्थ असा की, त्यांच्यात चिंतेचे प्रमाण जास्त असते.

नैराश्य आणि चिंता –
एका संशोधनानुसार, जेव्हा आईला ताणतणावपूर्ण काम देण्यात येते तेव्हा स्ट्रेसफुल महिलांमध्ये प्रेगन्सीदरम्यान, बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. तर दुसऱ्या संशोधनानुसार, असे दिसून आले आहे की, उदासीनता असलेल्या प्रेग्नंट महिलांच्या मुलांमध्ये भावनांचे नियमन करणाऱ्या मेंदूच्या भागात ॲक्टिव्हिटी कमी आढळून येते.

 

 


हेही वाचा : प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी वापरू नयेत ‘असे’ कपडे

 

- Advertisment -

Manini