घरमहाराष्ट्रRashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता

Subscribe

फोन टॅपींग प्रकरणी चर्चेत आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचीही माहिती आहे. तसेच याबाबत लवकरच फाइलवर सही करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी चार महिने शिल्लक आहेत. मात्र, त्यांना आता आणखी दीड वर्ष मुदतवाढ (एक्स्टेन्शन) मिळण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. (Rashmi Shukla Director General of Police Rashmi Shukla is likely to get an extension)

फोन टॅपींग प्रकरणी चर्चेत आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचीही माहिती आहे. तसेच याबाबत लवकरच फाइलवर सही करणार असल्याची माहिती मिळत आहे. जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. असे असतानाच सेवानिवृत्तीची चार महिने शिल्लक असताच त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांना मिळणाऱ्या मुदवाढीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Budget Session : “उगाच टीका करू नका,” अर्थमंत्री अजित पवारांचा विरोधकांना ‘स्वाभिमानी’ टोला

फोन टॅपींग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

रोहित पवारांनी केली सरकारवर टीका

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, भाजप कधीही कायदा पाळत नाही. लोकसभेत फायदा व्हावा यासाठी हे रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिले जात आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत यांना फायदा होण्यासाठी हे केले जात असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -