Saturday, April 13, 2024
घरमानिनीHealthनॉर्मल डिलिव्हरीसाठी करा योगासने

नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा योगासने

Subscribe

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अद्भुत अनुभूती आहे. प्रेगन्सीमध्ये महिलेच्या शरीरात अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. अशावेळी प्रेग्नेंट महिलांनी योगाभ्यास करून आरोग्याची काळजी घेणे आवश्य्क असते. योगा केल्याने शारीरिकदृष्ट्या तुम्ही मजबूत आणि मानसिकदृष्ट्या शांत राहालच शिवाय नॉर्मल डिलिव्हरीसाठी योगासने करणे फायद्याचे ठरते.

कोनासन –
कोनासनाला कोना मुद्रा असे देखील म्हटले जाते. हे उभे आणि बाजूला झुकणारे योगासन आहे. या आसनामुळे गर्भाशय मजबूत होते. ते अंडाशय देखील निरोगी ठेवते. प्रेग्नसीमध्ये महिलांना अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या उदभवते, या आसनामुळे ही समस्या देखील दूर होते. कोनासन गर्भधारणेचे वजन व्यवस्थपित करण्यास देखील उपयुक्त ठरते. कोनासनमुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे पायात सूज येत नाही.

- Advertisement -

वीरभद्रासन –
प्रेगन्सीमध्ये वीरभद्रासन खूप उपयुक्त ठरते. वीरभद्रासन पाय, नितम्ब, पाठीचा कणा आणि ओटीपोटाचे स्नायू मजबूत करते. ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी मदत करणारे हे योगासन श्वसनाच्या समस्या दूर करते. यामुळे शरीर आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारते. परिणामी, एकाग्रता वाढते.

बद्धकोनासन –
बद्धकोनासनाला बटरफ्लाय आसन असे देखील म्हणतात. ज्या महिलाना प्रसूती वेदनांची भीती वाटते त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. बटरफ्लाय आसनाच्या मदतीने तुम्ही तुमची कमी वेदनांसह नॉर्मल डिलेव्हरी करू शकता. या आसनामुळे शरीरात लवचिकता येते तसेच महिलेचा थकवाही दूर होतो.

- Advertisement -

त्रिकोणासन –
प्रेग्नसीमध्ये वजन वाढल्याने अनेक महिलांचे संतुलन बिघडते. प्रेग्नेंट महिलांच्या या समस्येवर त्रिकोणसान हा ऊत्तम पर्यय आहे. याने शरीराचा समतोल राखण्यास मदत होते. हे आसन पाठीचा खालचा भाग आणि नितंब मजबूत करते. तसेच नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपयुक्त आहे. तसेच या योगासनामुळे महिलेची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

मार्जरीआसन –
तुमची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर मार्जरीआसन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. या योगासनामुळे डिलिव्हरीदरम्यान होणारी वेदना कमी होऊन डिलिव्हरी नॉर्मल होते. प्रेग्नंट स्त्रियांचे ब्लड सर्क्युलेशन देखील चांगले राहते. शिवाय तणावही कमी होतो.

 

 

 


हेही वाचा : प्रेगन्सीमध्ये या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा

 

- Advertisment -

Manini