आजच्या काळातील लाइफस्टाइल पाहता ती फार डिस्टर्ब दिसून येते.काही लोक अधिक स्ट्रेस घेतात, तर काही एंग्जायटी आणि डिप्रेशनचा शिकार होतात. तुम्हाला स्ट्रेस, एंग्जायटी आणि डिप्रेशनमधील फरक माहितेय का?
स्ट्रेस
स्ट्रेसला सोप्या भाषेत तुम्ही टेंन्शन असे म्हणू शकता. जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर नकारात्म भावनांप्रमाणे होतो. एखादी घटना किंवा विचारामुळे तुम्ही तणावाखाली जाऊ शकता. बहुतांश वेळा ही स्थिती आपोआप ठिक होते.
एंग्जायटी
एंग्जायटीला चिंतेच्या रुपात ओळखले जातात. एंग्जायटीच्या स्थितीत बहुतांश लोकांना भीती किंवा बैचेन झाल्यासारखे वाटते. एंग्जायटीमध्ये व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची भीती वाटते आणि अशातच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले जातात. त्या व्यक्तीला घाम येऊ लागतो.एंग्जायटीची समस्या काही वेळासाठी असते. मात्र काही स्थितीत ही समस्या दीर्घकाळासाठी सुद्धा राहू शकते.
डिप्रेशन
डिप्रेशन किंवा नैराश्य मानसिक आरोग्याच्या एक गंभीर समस्येपैकी एक आहे. जो व्यक्ती डिप्रेशनचा शिकार असतो त्याच्या मनात नेहमीच निगेटिव्ह विचार येतात. डिप्रेशन व्यक्तीला अशा प्रकारे प्रभावित करू शकतो की, त्याच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो.
हेही वाचा- सतत थकवा येण्याची ‘ही’ असू शकतात कारणे