Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthकिडनीच्या रुग्णांनी चुकूनही या डाळी खाऊ नयेत

किडनीच्या रुग्णांनी चुकूनही या डाळी खाऊ नयेत

Subscribe

शरीराचा प्रत्येक भाग काही ना काही महत्वाचे कार्य करतो. यातील एक महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. हे केवळ शरीरातील टाकाऊ उत्पादने बाहेर टाकत नाही तर अतिरिक्त द्रव देखील फिल्टर करते. त्याच बरोबर शरीरातील मिनरल्सचाही समतोल राखतो. किडनी शरीरासाठी अत्यंत महत्वाचा अवयव आहे, त्यामुळे जेव्हा एखादया व्यक्तीला किडनीचा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्याच्या रक्तात टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात. अशावेळी आपल्या आहारात काही बदल करणे आवश्यक असते. डाळीचे सेवन किडीनीच्या रुग्णांसाठी वरदान मानण्यात येते, मात्र असे असले तरी काही डाळी या रुग्णांनी खाऊ नयेत, याचे सेवन त्यांच्यासाठी हानिकारक मानले जाते.

मसूर डाळ – जर तुम्ही किडनीचे पेशंट असाल तर मसूर डाळीचे सेवन करणे टाळा. मसूर डाळीमध्ये इतर डाळींच्या तुलनेत पोटॅशियम आणि फॉस्फरचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियमयुक्त पदार्थ अशा लोकांसाठी हानिकारक असू शकतात ज्यांचे किडनी योग्यरीत्या काम करू शकत नाही. वास्तविक, अशा रुग्णाची किडनी रक्तप्रवाहातून अतिरिक्त पोटॅशियम योग्यरीत्या फ्लिटर करू शकत नाही.

- Advertisement -

उडीद डाळ – उडदाची डाळ खायला चांगली असली तरी किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी उडीद डाळ खाणे टाळावे. उडीद डाळीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस देखील पुरेशा प्रमाणात असतात, ज्यामुळे किडनीच्या रुग्णांना या डाळीच्या सेवनाने त्रास होऊ शकतो. इतकंच नाही तर उडीद डाळीमुळे शरीरात युरिक ऍसिडचा उत्पादन वाढतं आणि म्हणूनच ही डाळ किडनी पेशंटसाठी चांगली मानली जात नाही.

- Advertisement -

तूर डाळ – ज्यांना किडनीचा आजार आहे त्यांनी तूर डाळ खाऊ नये. तूर डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या समस्या आणखी वाढू शकतात. एवढेच नाही तर या डाळीचे अतिसेवन केल्याने पोटात स्टोनची समस्या वाढू शकते.

 

 

 


हेही वाचा : Stomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय

- Advertisment -

Manini