घरमहाराष्ट्रHolidays IN April : निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये सुट्ट्यांची मेजवानी;...

Holidays IN April : निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये सुट्ट्यांची मेजवानी; वाचा सविस्तर…

Subscribe

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता इतर मुलांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षा आधीच संपल्या असून त्यांची उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुट्टी हा विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचा असतो आणि शाळेतील मुले मोठ्या सुट्टयांची वाट पाहत असतात. शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार सुट्ट्या ठरतात आणि संपूर्ण वर्षात विविध सणांना विद्यार्थ्यांना किती सुट्ट्या मिळणार यासंदर्भात माहिती दिली जाते. मार्चमध्ये विद्यार्थ्यांना विविध सणांमुळे सुट्ट्या मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जवळपास 10 ते 11 दिवस सुट्ट्या मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Holidays IN April Students feast on holidays in April in the wake of elections and festivals)

हेही वाचा – Varsha Gaikwad : …विरोधकांची कोंडी करण्यासाठी हुकूमशाहाची शेवटची धडपड; काँग्रेसचा मोदींवर हल्लोबाल

- Advertisement -

देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून त्यातील 19 एप्रिल आणि 26 एप्रिल या दोन तारखांना लोकसभा निवडणुकीतील 2 टप्पे होणार आहेत. राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमुळे शाळेत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळेतील शिक्षण मतदानाच्या कामत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच गुढीपाडवा आणि ईद शिवाय विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत.

हेही वाचा – BharatRatna : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अपमान; भारतरत्न देताना द्रौपदी मुर्मू उभ्या अन् मोदी खुर्चीवर बसून

- Advertisement -

एप्रिल महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार असून 7 एप्रिस, 14 एप्रिल, 21 एप्रिल आणि 28 एप्रिलला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना आठवड्याची सुट्टी मिळणार आहे. याशिवाय 9 एप्रिलला गुढीपाडवा, 11 एप्रिलला ईद निमित्त शाळा बंद असतील. 13 एप्रिलला बैसाखी सणामुळे पंजाब-हरियाणातील अनेक क्षेत्रांमध्ये शाळा बंद असतील. 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी असते. मात्र या दिवशी रविवार आल्याने विद्यार्थ्यांची ही सुट्टी वाया जाणार आहे. यानंतर 17 एप्रिलला विद्यार्थ्यांना राम नवमीची सुट्टी मिळेल आणि त्यानंतर 21 एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे. याचा अर्थ एप्रिलच्या 30 दिवसांच्या महिन्यात विद्यार्थ्यांना 10 ते 11 दिवस सुट्टी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -