Saturday, April 13, 2024
घरमानिनीHealthलघवी करताना जळजळ , ही आहेत कारणे आणि उपाय

लघवी करताना जळजळ , ही आहेत कारणे आणि उपाय

Subscribe

अनेक महिलांना लघवी करताना जळजळ आणि वेदना होण्याची समस्या जाणवते. प्रामुख्याने, उन्हाळ्यात हा त्रास प्रकर्षाने जाणवतो. काही जण याकडे दुर्लक्ष करतात पण असे करणे आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. लघवी करताना वेदनादायक जळजळ होणे सामान्य नाही, यासाठी त्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

लघवी करताना जळजळ होण्याची कारणे –

- Advertisement -

किडनी इन्फेक्शन – जर लघवी करताना जळजळ होत असेल तर ही समस्या किडनी इन्फेक्शनही संबंधित असू शकते. अशावेळी तुम्ही तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. लघवीत जळजळ होण्याबरोबर जास्त पाठदुखी होत असेल तर डॉक्टरकडे जा. कधी कधी युटीआयच्या स्थितीत किडनी इन्फेक्शन होते, ज्यामुळे समस्या गंभीर बनू शकते.

- Advertisement -

किडनी आणि ब्लॅडर स्टोन – जेव्हा शरीरातील मिनरल्स एकमेकांना जोडून क्रिस्टल रूप धारण करतात, तेव्हा स्टोन असे म्हटले जाते. हे स्टोन किडनी आणि ब्लॅडरमध्ये अडकतात. ज्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण मिळते.

बॅक्टेरिया योनीओसिस – बक्टेरियल योनीओसिस हा एक सामान्य व्हजायनल इन्फेक्शन आहे, जो बऱ्याचदा महिलांमध्ये दिसून येतो. ही समस्या सहसा सेक्सशुअली ऍक्टिव्ह असणाऱ्या महिलांना अधिक त्रास देते. अशावेळी व्हजायनलमधील हेल्दी आणि हानिकारक बॅक्टेरिया असंतुलित होतात, ज्यामुळे संसर्गाची लक्षणे दिसून येतात. या स्थितीत जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा वल्व आणि व्हजायनलमध्ये खाज जाणवू शकते, तसेच तीव्र वेदनाही जाणवतात.

डिहायड्रेशन – जर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल आणि शरीर डिहायड्रेट असेल तर लघवी करताना जळजळ आणि वेदना जाणवू शकते. यावर उपाय म्हणून तुम्ही पुरेसे पाणी प्यायल्यात तर कालांतराने तुमची समस्या जाणवणार नाही.

व्हजायनल टिअर्स – जर तुम्ही पेनिट्रिव्ह सेक्सदरम्यान, पुरेसे लुब्रिकेंट वापरत नसाल तर अशावेळी व्हजायनल टिअर्सला सामोरे जावे लागते. अशावेळी लघवी करताना जळजळ आणि वेदना जाणवू शकतात. हे टाळण्यासाठी सेक्सशुल ऍक्टिव्हिटी करताना संरक्षण आणि लुब्रिकेंट वापरायला हवे.

 

 

 


हेही वाचा : 

- Advertisment -

Manini