Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthकोमट पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे

कोमट पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे

Subscribe

थंडीच्या दिवसात शरीरात गरमपणा टिकवून ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण कोमट पाणी पितात. पण खरे पाहता, इतर दिवशी सुद्धा कोमट पाणी शरीरासाठी फायद्यचे ठरले आहे. याने शरीर ताजेतवाने तर होतेच पण अनेकवेळा शरीर रोगांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणारे कोमट पाणी पिण्यापुर्वी त्याचे फायदे जाणून घेऊयात,

1) ऋतू संसर्गापासून बचाव करण्यासाठी फायद्यचे
हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि नाक वाहण्याच्या समस्या सुरु होतात. यावेळी अनेक जण आजारांपासून दूर राहण्यासाठी कोमट पाणी पितात. याने तुम्हाला घशाचे इन्फेक्शन आणि सर्दी खोकला सारखे आजार दूर ठेवण्यास मदत मिळते. यासोबतच रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पाणी टाकून प्यायल्याने शरीरात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची पातळी राखली जाते.

Health Tips Marathi: Drink hot water? Can cause serious damage । गरम पाणी पिताय? होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या फायदे तोटे

2) वेटलॉससाठी अत्यंत फायद्यचे
शरीरात साठलेल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे मेटॅबॉलिझम क्रिया मजबूत होते आणि साठलेले अतिरिक्त फॅट्स जळू लागतात.

3) रक्ताभिसरण व्यवस्थित होते
दररोज कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह नियमित राहतो, ज्यामुळे शरीराला हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळाने कोमट पाणी जरूर प्या. यामुळे रक्ताभिसरण वाढते. याशिवाय कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील थकवा दूर होण्यासही मदत मिळते.

4) त्वचा आणि केसांना फायदेशीर
कोमट पाणी प्यायल्याने शरीराला डिहायड्रेशनपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेतील हुमिडिटी टिकून राहते, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते. तसेच केस गळण्याची समस्याही टाळता येते.

5) पचनक्रिया सुधारण्यास फायद्यचे
जर तुम्ही कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या संबधित आजारांपासून आराम मिळतो. तसेच ॲसिडिटीमुळे होणाऱ्या जळजळीपासून देखील आराम मिळतो.

6) शरीर डिटॉक्स करण्यास मदत
कोमट पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते.

 

- Advertisement -

हेही वाचा; आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने राहाल हेल्दी

 

- Advertisment -

Manini