Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthउन्हाळा आणि युरिनरी इन्फेक्शन

उन्हाळा आणि युरिनरी इन्फेक्शन

Subscribe

उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. उन्हाळ्यात उष्माघातासोबत प्रामुख्याने जाणवणारा त्रास म्हणजे युरिनरी इन्फेक्शन. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या जागी संसर्ग होणे ही सर्रासपणे आढळून येणारी अतिशय वेदना जाणवणारी समस्या आहे. उन्हाळ्यातील आद्र आणि उष्ण हवामानामुळे हा त्रास जाणवतो. आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे UTI अर्थात मूत्रमार्गातील संसर्गाच्या त्रासाला अनेक महिला बळी पडत आहेत.

केवळ विवाहित किंवा वृद्ध महिलाच नाही तर तरुण मुलींनाही UTI ची समस्या जाणवत आहे. तुम्हालाही अशी काही समस्या जाणवत असेल तर त्यासाठी तुमच्या काही चुका जबाबदार असू शकतात. जाणून घेऊयात, UTIच्या समस्या कशी टाळावी आणि त्यावरील उपाय काय,

- Advertisement -

UTI चा संसर्ग –

UTI संसर्ग असा संसर्ग आहे, ज्याचा मूत्रमार्गावर परिणाम होतो. ज्याने लघवी करताना जळजळ, वेदना जाणवते. जेव्हा कोणतेही हानिकारक जिवाणू, मूत्रमार्गाचा भागात प्रवेश करतात तेव्हा तो भाग सुजतो आणि नंतर संसर्ग निर्माण होतो. UTI तुमच्या मूत्रमार्गात कोठेही होऊ शकतो. किडनी, ब्लॅडर, मूत्रवाहिनी आदींवर संसर्गाचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, अस्वच्छ टॉयलेटमुळे UTI धोका अधिक पटींनी वाढतो. हे टाळण्यासाठी प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेसह काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

15 ते 40 वयोगटातील मुलींना असतो धोका –

पुरुषांपेक्षा हा संसर्ग स्त्रियांना अधिक प्रमाणात होतो. सुमारे 40 टक्के स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी या संसर्गाला बळी पडतात. 15 ते 40 वयोगटातील स्त्रियांना ही समस्या प्रामुख्याने जाणवते.

‘या’ चुकांमुळे होते UTI ची समस्या –

बराच वेळ लघवी रोखून धरणे
लिक्विड कमी प्रमाणात पिणे
जास्त प्रमाणात कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करणे
एकच पॅड जास्त वेळ वापरणे
पिरीएड्स दरम्यान स्वछता न राखणे
लघवी केल्यावर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ न करणे

UTI लक्षणे –

वारंवार लघवीला होणे
लघवीचा रंग बदलणे
जळजळ आणि दुर्गंधी जाणवणे
ओटीपोटात तीव्र वेदना जाणवणे
तीव्र पाठदुखी
थकवा आणि चक्कर येणे

UTI कसे टाळाल –

भरपूर पाणी प्यायल्याने ब्लॅडरमध्ये जमा झालेले बॅक्टेरिया निघून जातात, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. याशिवाय दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी अवश्य प्या तुम्ही लिंबू पाणी, नारळ देखील पिऊ शकता. तसेच आहारात आंबटवर्गीय फळांचा समावेश करा. यासह प्रायव्हेट पार्ट्सची स्वछता राखा. पिरीएड्स दरम्यान एकच पॅड जास्त काळ वापरू नका. असे केल्याने संसर्गास कारणीभूत असणारे बेक्टेरिया नष्ट करून ही समस्या टाळता येते.

 

 


हेही वाचा : उन्हाळ्यातील आजार, लक्षणे आणि काळजी

- Advertisment -

Manini