वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये अर्थराईटीसचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अर्थराईटीस म्हणजेच संधिवात. खास करून थंडीच्या दिवसात सांधेदुखी, स्नायूंचा ताण किंवा क्रॅम्पसची समस्या प्रामुख्याने जाणवायला सुरुवात होते. अशाने गुडघेदुखीसोबत सूजही वाढते. परिणामी, चालताना आणि उठताना-बसताना त्रास होतो. महिलांमध्ये प्रामुख्याने ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. तुम्हाला पण जर ही समस्या भेडसावत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा.
‘अर्थराईटीस’ म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते हा जॉइंट डिसऑर्डर आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती सांध्याच्या लायनिंगवर हल्ला करते. ज्याने सांधे दुखू लागतात शिवाय सूजही येते. तसेच संधिवाताचा परिणाम शरीराच्या इतर भागावरही होतो.
चाळीशीनंतर महिलांमध्ये वाढतोय धोका
बहुतेक स्त्रियांमध्ये चाळिशीनंतर संधिवात वाढण्याची शक्यता अधिक असते. एका संशोधनानुसार, हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांना तीनपटीने जास्त प्रभावित करतो. वयाच्या तिशीनंतर प्रेग्नसी, ब्रेस्ट फिडींग, मेनोपॉज आणि PCOS यांमुळे स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. ज्याने शरीरात वेदना आणि सूज वाढते.
अर्थराईटीसची लक्षणे –
ज्वाइंट स्टिफनेस – स्टिफनेस म्हणजे कडकपणा. जे लोक अर्थराईटीसचे म्हणजे संधिवाताचे बळी ठरले आहेत. त्याच्या सांध्यामध्ये कडकपणा वाढतो. परिणामी, अशा स्त्रियांना सकाळी उठल्यावर चालण्यास त्रास होतो. याशिवाय पायात सूज येण्याची समस्याही जाणवते.
सांध्यामध्ये सूज आणि वेदना जाणवणे – संधिवात झाल्यास सांध्यांमध्ये क्रॅम्प्स, वेदना आणि सूज वाढू लागते. सर्वप्रथम याचा परिणाम हात, मनगट आणि पाय यांच्या सांध्यावर होतो. ज्याने एखादी वस्तू पकडताना त्रास होतो. पायऱ्या चढताना आणि उतरताना त्रास होतो.
मुंग्या येणे – पायात सुन्नपणा वाढतो आणि हातापायांना मुंग्या येतात. ही समस्या जर वारंवार तुम्हाला भेडसावत असले तर ती टाळण्यासाठी डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.
थकवा जाणवणे तसेच भूकही कमी लागणे – सांध्यातील वाढत्या दुखण्यामुळे चालताना त्रास जाणवतो. ज्याने नियमित भूक लागत नाही. परिणामी, योग्य आहार न घेतल्याने थकवा जाणवतो.
हेही वाचा ; थायरॉईडचे संतुलन राखण्यासाठी ‘ही’ फळे खावीत