Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthथंडीत घामाच्या दुर्गंधीवर करा 'हे' उपाय

थंडीत घामाच्या दुर्गंधीवर करा ‘हे’ उपाय

Subscribe

घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या शरीराला घाम हा येतोच. बहुतेकवेळा अति उष्णतेमुळे, किंवा शरीराचे तापमान नियंत्रित नसल्या कारणांनी त्वचेच्या छिद्रांना घाम येऊ लागतो. तसेच या घामामध्ये एक प्रकारचे ऍसिड असते. आणि त्याचा वासही खूप येतो. यासोबतच काही लोकांच्या घामाला उग्र वास येतो तर काहींच्या घामाला अजिबात वास येत नाही.

घामाची समस्या बहुतांशी उन्हाळ्यात उद्भवत असली तरी काहींना ही समस्या हिवाळ्यातही होते. अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्याच्या जवळ उभे राहिलात तरी तुमच्या आजूबाजूचे लोक घामाच्या वासाने त्रस्त होतात. अशावेळी तुमच्या शरीराची काळजी घेण्याच्या रुटीनमध्ये काही गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे घामाचा त्रास कमी होईल. तसेच पायाच्या बोटांमधून आणि एकूणच अंगावाटे घाम बाहेर पडतो. या घामाला कमी करण्यासाठी किंवा घाम स्वच्छ राहण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

- Advertisement -

Why Do Some People Sweat More Than Others?

1.आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून आंघोळ करावी-

जर तुमच्या शरीरात खूप घाम येत असेल आणि तुम्हाला त्याच्या वासाने त्रास होत असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबाची सालेही पाण्यात टाकू शकता. एवढेच नाही तर लिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातून तेल आणि घाम कमी निघतो.

- Advertisement -

2. अंडरआर्म्सला गुलाबपाणी लावा-

गुलाब पाण्यात फक्त एकच नाही तर अनेक गुणधर्म आहेत. हे त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही कारण यात केवळ मॉइश्चरायझिंग गुणधर्मच नसतात तर त्यामध्ये असलेला सुगंध तुमच्या शरीरातून येणारा दुर्गंधही दूर करतो. जर तुमच्या अंडरआर्म्सला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा तुमच्या अंडरआर्म्सवर गुलाब पाण्याचा स्प्रे फवारत राहा. तुम्हाला दिवसभर महागड्या परफ्युमची गरज भासणार नाही आणि यामुळे तुमच्या अंडरआर्म्सचा काळपटपणाही दूर होईल.

3. पायाला घाम येत असेल तर शूजमध्ये दालचिनी पावडर घाला-

काही लोकांच्या पायाला इतकी दुर्गंधी येते की कुणालाही त्यांच्या जवळ बसणे कठीण होऊन जातं. तसेच थंडीतही अनेकांच्या पायाला घाम येतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या शूजमध्ये दालचिनी पावडर घालावी. इतकेच नाही तर दालचिनीचा छोटा तुकडा घालून शूज घातले तरी पायाला दुर्गंधी येणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शूजमध्ये लवंग किंवा मोठी वेलची देखील ठेवू शकता, यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील.


हेही वाचा : हिवाळ्यातील श्वसनविकारापासून व्हा सावध

- Advertisment -

Manini