Saturday, May 18, 2024
घरमानिनीHealthवॉटर बर्थ डिलिव्हरी म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

वॉटर बर्थ डिलिव्हरी म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

Subscribe

जेव्हा डिलीवरीची वेळ येते तेव्हा दोन ऑप्शन्स निवडले जातात. जसे की, नॉर्मल अथवा वजाइनल बर्थ किंवा सी सेक्शन डिलीवरी. मात्र आजकाल आणखी एका डिलीवरच्या ऑप्शनचा समावेश झाला आहे. ती म्हणजे वॉटर बेबी बर्थ डिलीवरी. दुसऱ्या देशांमध्ये ही टेक्निक अधिक प्रचलित आहे. यामध्ये पाण्यात बाळाची डिलीवरी होते. या टेक्निकनचे नक्की फायदे आणि तोटे काय आहेत हे पाहूयात.

वॉटर बर्थ डिलिव्हरी फायदे काय आहेत –
वाटर बर्थ डिलिव्हरी मध्ये महिलेचे लेबर पेन किंवा तिची डिलिव्हरी पाण्यात केली जाते. ही डिलिव्हरी रुग्णालयात, बर्थ सेंटर किंवा घरी केली जाऊ शकते. यात तुम्हाला नर्स आणि डॉक्टर मदद करतात.

- Advertisement -

आरामदायी
वॉटर बर्थ डिलीवरीचा सर्वाधिक मोठा फायदा म्हणजे याने फीटल कॉम्पिकेशन्स कमी होतात. या प्रोसेसमध्ये टेंस नर्वस आणि मसल्सला आराम मिळण्यास मदत होते. ही एक आरामदायी प्रोसेस आहे.

नॅच्युरल पेन रिलीफ
वॉटर बर्थ दरम्यान गरम पाणी हे एका नैसर्गिक पेन रिलीवरचे काम करते. यामुळे स्नायूंना आणि नव्हर्सला आराम मिळतो. त्याचसोबत ब्लड प्रेशर ही नियंत्रणात राहते.

- Advertisement -

लेबरचा वेळ कमी होतो
काही अभ्यास असे सांगतात की, लेबरच्या फर्स्ट स्टेज दरम्यान गरम पाण्यात राहिल्याने लेबरचा वेळ कमी होतो.

कमी कॉम्पिलेकशन्स
ज्या महिला वॉटर बर्थचा पर्याय निवडतात त्यांच्यामध्ये तणाव कमी दिसते. इतकेच नाही तर यामुळे बाळाच्या जन्मावेळी त्याला दुखापत होण्याची शक्यता ही फार कमी असते.

वॉटर बर्थ डिलीवरीमुळे होणारे नुकसान

  1. वॉटर बर्थमुळे गर्भवती महिला आणि बाळाला इंन्फेक्शन होण्याची शक्यता निर्माण होते
  2. बाळाला पाण्यातून बाहेर काढताना नाळ तुटण्याची शक्यता वॉटर बर्थ डिलीवरीमुळे निर्माण होते
  3. बाळाच्या शरिराचे तापमान अधिक वाढू किंवा कमी होण्याची शक्यता असते.

खरंतर बॉटर बेबी बर्थ सुरक्षित आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या उपस्थितीत ते करावे. ऐवढेच नव्हे तर एखाद्या प्रेग्नेंट महिलेला डायबिटीस किंवा हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तिने हा पर्याय निवडू नये. प्रीमेच्योर डिलीवरीत ही याचा सल्ला दिला जात नाही.

 

 


हेही वाचा : लहान मुलं तोंडात बोट का घालतात? ‘ही’ आहेत कारणं

- Advertisment -

Manini