घरदेश-विदेशZomato फक्त 10 मिनिटांत पोहोचवणार घरपोच ऑर्डर; आता रोहित पवार म्हणतात...

Zomato फक्त 10 मिनिटांत पोहोचवणार घरपोच ऑर्डर; आता रोहित पवार म्हणतात…

Subscribe

प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आपल्या ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत ऑर्डर पोहचवणार आहे. Zomato चे संस्थापक आणि CEO दीपंदर गोयल यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. दीपिंदर गोयल यांनी ट्विट करत म्हटले की, झोमॅटो प्लॅटफॉर्म अन्नाची गुणवत्ता राखत आणि डिलिव्हरी पार्टनरच्या सुरक्षेशी तडजोड न करता 10 मिनिटात तुमची खाण्याची ऑर्डर पोहच करेल. यासोबतच कंपनी यासाठी आपल्या फुट डिलिव्हरी पार्टनरवर दबाव आणणार नाही असे ते म्हणाले. मात्र कंपनीच्या या निर्णयावर आता राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

दीपंदर गोयलने 10 मिनिटांत डिलिव्हरी होण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, ग्राहकांकडे वेळ नसतो. त्यामुळे त्यांना उशीर न करता अन्न खाण्याची इच्छा असते. यावरून आम्हाला असे वाटले की, झोमॅटोचा फूड ऑर्डर पोहच करण्याचा 30 मिनिटांचा वेळ खूपच जास्त आहे. त्यामुळे आम्ही यात बदल केला नाही तर लवकरच 10 मिनिटात ऑर्डर पोहच करण्याची ऑफर कोणीतरी आणेल आणि यामुळे आम्ही शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

- Advertisement -

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल पुढे म्हणाले की, आम्ही झोमॅटो इन्स्टा सोबत आमची 10 मिनिटांत फूड डिलिव्हर करण्याची ऑफर आणली आहे. गोयल यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, आतापर्यंत जगात कोणीही 10 मिनिटांत गरम आणि ताजे फूड मोठ्या प्रमाणावर वितरित केलेले नाही.

- Advertisement -

आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

मात्र झोमॅटो कंपनीच्या या निर्णयावर राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची @zomato ची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे झोमॅटो कंपनी रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या मुद्दांवर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


Omicron Variant: सावधान! ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट घालू शकतो धुमाकूळ, अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -