Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthब्युटी पार्लर स्ट्रोक सिंडोम म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती

ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंडोम म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती

Subscribe

सध्या सर्वत्र ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन ब्युटी ट्रीटमेंट करून घेणे हा एक ट्रेंड बनला आहे. काहीजण पार्लरमध्ये हेअर शॅम्पू, स्पा, केसांची ट्रीटमेंटही घेतात. पण, पार्लरमध्ये केसांचे उपचार करताना ज्याला आपण आराम आणि लक्झरी मानतो ते केवळ मानदुखीच नाही तर प्राणघातक देखील ठरू शकते. एक अहवालानुसार, हेअरवॉशमुळे ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम होतो. यामध्ये केस धुतल्यानंतर एखादया व्यक्तीला न्यूरॉलॉजिकल लक्षणे जाणवतात. ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंडोमची समस्या फार कमी लोकांमध्ये दिसून येत असली तरी काळजी घेणे आवश्यक असते.

ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणजे काय?

- Advertisement -

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सलूनच्या खुर्चीवर बसविले जाते आणि वॉश बेसिनच्या सिंकमध्ये केसांना मसाज करताना शॅम्पूने केसांना धुतले जाते तेव्हा हा स्ट्रोक येतो. या प्रक्रियेत मान मागे वळवली जाते आणि वॉश बेसिनच्या सिंकवर ठेवली जाते. तेव्हा पाय सरळ खुर्चीवर राहतात. केस धुतल्यानंतर केस सुकविण्यासाठीही मान मागे ठेवावी लागते. म्हणेजच मान एका कोनात स्थिर ठेवावी लागते. केस धुणे आणि केस वाळवण्याच्या प्रक्रियेस सुमारे ३० ते ४० मिनिटे लागतात. या स्थितीत दीर्घकाळ राहिल्यास मानेच्या मागच्या बाजूला हृदयाकडून मेंदूकडे जाणाऱ्या उभ्या धमन्यांवर दबाव येतो.

बऱ्यचा लोकांमध्ये, या धमन्या संकुचित होतात, ज्यामुळे मेंदूतील ऑक्सिजनचे सर्क्युलेशन कमी होते आणि रक्तप्रवाह देखील मंदावतो आणि जर त्यांच्यात आधीच काही दोष असेल तर किंवा धमन्या खूप पातळ असतील तर प्रेशरमुळे त्यांच्या आतील थर फुटण्याचा धोका असतो. रक्ताच्या लहान गुठळ्या तयार होतात. रक्तप्रवाहासह, या गुठळ्या मेंदूपर्यत पोहचतात आणि मेंदूच्या धमन्या ब्लॉक करतात. यामुळे सेरेबेलर ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यत अधिक असते. शरीराच्या अवयवांना योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे त्याच्यावरही परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

- Advertisement -

 


लक्षणे – स्ट्रोकनंतर एखाद्या व्यक्तीला चक्कर येणे, मळमळ, उलट्या, शरीराचे संतुलन बिघडणे, तीव्र डोकेदुखी, केस धुताना अंधुक दृष्टी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

उपचार – लक्षणे दिसू लागल्यास, व्यक्तीला शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे, विशेषतः न्यूरॉलॉजिस्टकडे घेऊन जावे जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.

खबरदारी कशी घ्याल ?

  • शक्यतो घरीच केस धुवून जावेत.
  • पार्लरमध्येच केस धुवायचे असल्यास, टॉवेल घ्या, उशीसारखा दुमडून सिंकमध्ये मानेच्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुमच्या मानेला आधार मिळेल.
  • मान 30 अंशापेक्षा जास्त मागे टाकू नका.
  • जास्त वेळ मान मागे टाकू नका 8 ते 10 मिनिटानंतर मन सरळ करा म्हणजे रक्तप्रवाह सुधारेल.

 

 

 


हेही वाचा : एकाच वेळी अनेक विचार ‘मंकी ब्रेन’ची लक्षणे

 

- Advertisment -

Manini