Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthएकाच वेळी अनेक विचार 'मंकी ब्रेन'ची लक्षणे

एकाच वेळी अनेक विचार ‘मंकी ब्रेन’ची लक्षणे

Subscribe

माकड हे एकाच जागी न थांबण्याचा सवयीसाठी ओळखले जातात. आपल्या मनाचेही तसेच आहे, जे नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असते. कधी कधी काही लोकांचे मनदेखील एका ठिकाणी किंवा एका गोष्टीवर टिकू शकत नाही. अशाने ते एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. यालाच ‘मंकी ब्रेन’ असे म्हटले जाते.

‘मंकी ब्रेन’ असलेल्या व्यक्तीचे विचार खूप विखुरलेले असतात. अशाने ते कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यांचे मनही एका जागी लागू शकत नाही. अशा व्यक्तींना कायम स्ट्रेस, टेन्शन आणि विचलनाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊयात मंकी ब्रेनची लक्षणे कोणती आहेत.

- Advertisement -

एकाग्रतेचा अभाव –
मंकी ब्रेनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे एकाग्रतेचा अभाव असणे. अशा व्यक्ती कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुम्ही आसपास अशा व्यक्ती पहिल्या असतील की, फोनवर नोटिफिकेशन्स येताच हातातली सर्व कामे सोडून ते फोन हाताळू लागतात. तुम्हीही जर यापैकी असाल तर एकाग्रता वाढविण्यासाठी तुमची महत्वाची कामे आधी करण्याचा प्रयन्त करा. जेणेकरून तुमचे लक्ष विचलित होणार नाही आणि तुमचे काम नीट आणि वेळेत पूर्ण होईल.

चालढकल –
एका कामावर लक्ष केंद्रित न करू शकल्यामुळे, बरेच जण कामामध्ये चालढकल करतात. अशाने ते कोणतेच काम पूर्ण करू शकत नाही. ही समस्या टाळण्यासाठी जी ती कामे ज्या त्या वेळीच करण्याचा प्रयन्त करा. अशाने तुम्हाला कधी कामाचे बर्डन येणार नाही.

- Advertisement -

मानसिक थकवा –
मानसिक थकवा हे सुद्धा मंकी ब्रेनचे लक्षण आहे. सतत कशाचातरी विचार करत राहिल्याने मन थकून जाते. अनेक जणांना अतिविचारामुळे मानसिक थकवा सहन करावा लागतो. ही समस्या टाळण्यासाठी माइंडफूल ॲक्टिव्हिटी करणे आवश्यक असते. अशाने मेंदूला आराम मिळतो. याशिवाय मनाला चार्ज करण्यासाठी पुरेशी झोप, सकस आहार आणि मेडिटेशन अवश्य करा.

अस्थिर मन –
मंकी ब्रेन असलेल्या व्यक्ती अनेक विचारांनी वेढलेले असतो. एकाच वेळी अनेक विचार डोक्यात असल्याने कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. परिणामी, दैनंदिन निर्णय घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

झोपेत व्यत्यय –
डोक्यात विचारांचे वादळ घोंघावत असल्याने झोपेत व्यत्यय निर्माण होतो. परिणामी, झोपेच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या उदभवतात. याशिवाय चिडचिड, थकवा यासारख्या समस्यांही जाणवू शकतात. अशा वेळी रात्री झोपताना विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी स्वतःपासून दूर रहा. झोपण्याच्या आधी थ्रिलर चित्रपट किंवा कॅफिनचे सेवन करू नका.

 

 

 


हेही वाचा : डिप्रेशनमधून स्वतःला कसं सावरायचं?

- Advertisment -

Manini