पोटली मसाला चहा तुम्ही प्यायला नसाल तर आता नक्की पिया. तसेच मसाला चहा हा सगळ्यांचा आवडता चहा आहे. अशातच कोणत्याही दिवसात चहा हा आवडीने प्यायला जातो. तर मग आता पोटली मसाला चहा घरी नक्की ट्राय करा. या चहासाठी साहित्य आणि कृती जाणून घेऊया…
साहित्य
- 1 चमचा चहाची पात
- 1 चमचा साखर
- 2 वेलची
- 1 मोठे आले ठेचलेले
- दालचिनीचा छोटा तुकडा
- 3-4 लवंग
कृती
- एक खोलगट भांडे घ्या. त्यामध्ये गरम पाणी घ्या आता हे पाणी चांगले उकळून घ्या.
- पाणी उकळत असताना त्या भांड्यावर एक सुती पांढरा कपडा रब्बरने बांधून ठेवा.
- हे झाल्यावर वरील साहित्य आता या कपड्यावर ठेवा.
- आता दुसऱ्या भांड्यात दूध गरम करत ठेवा.
- गरम दूध एका भांड्यात काढून घ्या.
- आता गरम केलेले पाणी आणि चहाचे सगळे साहित्य पुन्हा एकदा गरम करून घ्या.
- यानंतर दूध आणि चहा आता छान उकळून घ्या.
- आता तयार आहे तुमचा गरमागरम पोटली मसाला चहा.
हेही वाचा : परफेक्ट फिल्टर कॉफी बनवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -