Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRava Pizza : मुलांना मैदा नाही तर खावू घाला रवा Pizza

Rava Pizza : मुलांना मैदा नाही तर खावू घाला रवा Pizza

Subscribe

मुलांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे फास्ट फूड जास्त आवडते. पण बाहेरचे खाद्यपदार्थ हे चवीसोबतच आरोग्याला धोकादायक आहे. तसेच बाहेरचा पिझ्झा हा आपल्या आणि लहान मुलांच्या शरीरासाठी पचायला जरा कठीण असतो. अशातच मार्केट्समध्ये विकल्या जाणार्‍या बहुतेक खाद्यपदार्थांमध्ये रिफाइंड पीठ असते. जे वाढत्या मुलांसाठी देखील खूप हानिकारक आहे. तसेच रव्यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, फायबर इत्यादी गव्हाचे अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि यामुळे शरीर निरोगी राहते. तर मग आता आपण जाणून घेऊया रव्याचा पिझ्झा.

साहित्य

  • रवा – 1 कप
  • दही – 1/2 कप
  • लाल टोमॅटो प्युरी (किंवा टोमॅटो सॉस) – 1/4 कप
  • हिरवी मिरची – 1 लहान चिरलेली
  • कांदा – 1 लहान चिरलेला
  • शिमला मिरची – 1/4 कप
  • मोझारेला चीज
  • गाजर / बीन्स – 1/4 कप बारीक चिरलेले
  • चीज
  • तेल
  • पिझ्झा मीठ, मिरपूड पिझ्झा सीझनिंग करण्यासाठी

Suji/Rava - Healthy Tawa Pizza - No Bake Pizza Recipe

कृती

  • सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि लाल टोमॅटो प्युरी एकत्र करा.
  • हे सर्व चांगले मिसळा आणि 20-30 मिनिटे झाकून ठेवा म्हणजे रवा व्यवस्थित फुगतो.
  • यानंतर ओव्हन 180 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम करा.
  • आता पिझ्झा ट्रे प्रीहिटेड ओव्हनमध्ये ठेवा आणि रवा पिझ्झाचा बेस सेट करण्यासाठी त्याला चांगले ग्रीस करा.
  • फुगलेल्या रव्यामध्ये मीठ, मिरपूड आणि पिझ्झा मसाला घालून मिक्स करा.
  • नंतर रव्याचे मिश्रण पिझ्झाच्या ट्रेवर रोलिंग पिन किंवा हँड रोलिंग पिन वापरून पिझ्झाचा बेस म्हणून पसरवा. तसेच हा बेस छान जाड बनवा.
  • आता वर दिलेल्या सर्व भाज्या, पनीर आणि हिरवी मिरची घालून यावर पसरवा.
  • हे झाल्यावर त्यावर मोझझेरेला चीज घाला. आणि मग पुन्हा भाज्या घातल्यानंतर चीज पिझ्झावर व्यवस्थित पसरवा.
  • आता ओव्हनमध्ये 20-25 मिनिटे उच्च आचेवर रव्याचा बेस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पिझ्झा बेक करा.
  • पिझ्झा बेस गोल्डन ब्राऊन झाल्यावर ओव्हनमधून बाहेर काढा आणि सर्व्ह करा.

हेही वाचा : Vegetable Paratha Recipe : मिक्स व्हेजिटेबल पराठा

- Advertisment -

Manini