Saturday, May 4, 2024
घरमानिनीKitchenRecipe : मेथी मटर मलाई

Recipe : मेथी मटर मलाई

Subscribe

मेथीची अशी भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. आणि जरी मेथीची भाजी आवडत असली तरी तेच तेच खाऊन जर का तुम्ही कंटाळलात असाल तर एकदा तरी घरी मेथी मटर मलाई नक्की बनवा. चला तर मग जाणून घेऊया मेथी मटर मलाई सोप्या पद्धतीत कसे बनवायचे…

Methi Matar Malai - Cookifi | Catering Services in Bangalore

- Advertisement -

साहित्य

  • 1 कांदा, बारीक चिरलेला
  • 1 कप मेथी
  • 1/2कप मटार, (उकडलेले)
  • 1/2 कप क्रीम
  • 1/4 कप काजू किंवा बदाम
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून आले लसूण पेस्ट
  • 1 हिरवी मिरची
  • 2 चमचे तूप
  • 1 टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
  • सजावटीसाठी हिरवी कोथिंबीर

Methi Matar Malai | Fenugreek and Peas Cream Curry - Indiaphile

- Advertisement -

कृती

  • सर्वप्रथम ग्राइंडरच्या भांड्यात जिरे, चिरलेला कांदा, लसूण, आले आणि हिरवी मिरची घालून हे बारीक करून घ्या.
  • यानंतर त्यात कढईत तूप गरम करून त्यात जिरे टाका आणि तडतडू द्या. त्यात तयार केलेली पेस्ट घालून हे मिश्रण मिक्स करून घ्या.
  • आता त्यात बारीक चिरलेली मेथी घालून मिक्स करा.
  • यानंतर यात मटार घालून २-३ हे मिश्रण मिनिटे परतून घ्या. हे झाल्यावर 1 टेबलस्पून क्रीम घालून सगळं मिक्स करा.
  • आता ब्लेंडरमध्ये क्रीम, काजू, खसखस ​​घालून बारीक करून पॅनमध्ये काढा आणि सर्व मिश्रण मिक्स करा. मग त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • 2-3 मिनिटे मेथी मटर मलाई शिजवा.
  • शेवटी हिरव्या कोथिंबिर त्यावर घाला आणि नान बरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा : Recipe : चटपटीत पोहा समोसा

- Advertisment -

Manini