कोरियन मिरची तेल हे सर्वात आवडणाऱ्या मसाले पैकी एक आहे. हे अष्टपैलू तेल नूडल्स, तळलेले अंडी, डंपलिंग आणि राईस यासारख्या विविध कोरियन पदार्थांमध्ये वापरले जाते. तसेच स्वयंपाकघरातील काही साध्या घटकांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी चवदार कोरियन मिरचीचे तेल बनवू शकता. याला लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया…
साहित्य
- 1 कप व्हेजिटेबल ऑइल ऑफ चॉईस
- 1/4 कप कोरियन मिरची फ्लेक्स
- 2 चमचे तिळाचे तेल/ तीळ
- 1 टीस्पून सोया सॉस
- 1 टीस्पून साखर
- 3-4 चिरलेल्या लसूण पाकळ्या
कृती
- सर्वातप्रथम कढईत तेल घालून मंद आचेवर गरम करा.
- यानंतर कोरियन मिरचीचे फ्लेक्स घालून ढवळा.
- आता झाकण ठेवून तेल आणि कोरियन फ्लेक्स शिजू द्या.
- त्यात चिरलेला लसूण घालून टाका आणि मग 2-3 मिनिटे शिजवा.
- हे झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात सोया सॉस, साखर आणि तीळ घाला.
- सर्व साहित्य एकत्र करण्यासाठी नीट ढवळून घ्यावे.
- यांनतर मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
- तेल बनून झाल्यावर त्याला एका भांड्यात काढा आणि हवाबंद डब्यात पॅक कर मग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
- कोरियन मिरचीचे तेल योग्यरित्या बनवले आणि साठवले तर ते 6-8 आठवडे टिकते.
- जर का तुम्हाला तेलातून खराब वास येत असेल तर ताबडतोब ते तेल टाकून द्यावे.
- Advertisement -
________________________________________________________________________
हेही वाचा : Recipe: घरच्या घरी बनवा असा टोमॅटो सालसा
- Advertisement -
- Advertisement -