Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenRecipe : घरी बनवा मुगाच्या डाळीची पाणीपुरी

Recipe : घरी बनवा मुगाच्या डाळीची पाणीपुरी

Subscribe

पाणीपुरी हा पदार्थ सगळेच आवडीने खातात. पण बहुतेकवेळा पाणीपुरी ही बाहेर खाल्ली जाते. तर आता तुम्ही घरी बनवा मुगाच्या डाळीची चटपटीत पाणीपुरी. जाणून घ्या याला लागणारे साहित्य आणि कृती…

पुऱ्यांचे साहित्य

  • 250 ग्रॅम मुगाच्या डाळीचे पीठ
  • 1 कप रवा
  • 1 चमचा बेकिंग सोडा
  • 1 चमचा देशी तूप
  • 1 चमचा तेल

Pani Puri Recipe by deoyani - Cookpad

- Advertisement -

कृती

अशा बनवा पाणी पुरीच्या पुऱ्या-

  • सर्वात प्रथम एक भांड घ्या. त्यामध्ये मुगाच्या डाळीचे पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • आता यामध्ये बेकिंग सोडा,तूप आणि तेल एकजीव करून घ्या.
  • हलक्या हाताने हे पुऱ्यांचे पीठ छान मळून घ्या.
  • हे झाल्यावर या पिठाला एका कपड्यात बांधून ठेवा.
  • थोड्या वेळाने या पिठाच्या हलक्या हाताने पुऱ्या करून घ्या.
  • गरम तेलात या लाटलेल्या पुऱ्या तळून घ्या. या पुऱ्या गोल फुगतील.
  • हे झाल्यावर पुऱ्या रेडी होतील. मग यामध्ये बटाटा,पुदिन्याचे पाणी,गोड चटणी घाला.
  • चटकदार पाणी पुरी आता तयार आहे.

हेही वाचा : Recipe: कुरकुरीत पोह्यांचा चिवडा

 

- Advertisment -

Manini