रक्षाबंधनाच्या सणानिमित्त घरात अनेक प्रकारची मिठाई आली असेल तर या मिठाईपासून तुम्ही त्यापासून चविष्ट पराठे बनवू शकता. जर का तुम्ही मिठाईचे शौकीन असला आणि गोड खायला तुम्हाला आवडत असेल तर आता घरी बनवा उरलेल्या मावा मिठाई पासून टेस्टी पराठा. जाणून घेऊया याला लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- 2 ½ कप गव्हाचे पीठ
- ½ कप रवा
- 2 चमचे तेल
- मिठाईचे 7-8 तुकडे
- 1 चमचा तूप
- साखर चवीनुसार
- ¼ टीस्पून मीठ
कृती
- गोड पराठा बनवण्यासाठी मऊ पीठ मळून घ्या.
- यासाठी पीठ चाळून घ्या, नंतर त्यात वर दिलेले साहित्य घालून थोडे मीठ आणि रवा घालून मिक्स करा.
- यानंतर हळूहळू पाणी घालून मळून घ्या.
- आता पिठाच्या वर तेल लावा आणि 20 मिनिटे सेट होऊ द्या.
- यानंतर मिठाईचा तुकडा कापल्यानांतर त्यात चवीनुसार साखर घालून हाताने चांगले मिसळा.
- यानंतर छोटे लाडू बनवा. आता त्याचे बॉल करा.
- पीठ लाटून त्यात तयार गोडाचे लाडू टाकून त्याचे गोलाकार पराठे लाटा. आता रोटीप्रमाणे रोलिंग पिनने रोल करा.
- गॅसवर पॅन ठेवा आणि मध्यम आचेवर गरम करा.
- तवा गरम झाल्यावर पराठ्याला तूप लावून भाजून घ्या.
- उरलेल्या मिठाईपासून बनवलेला स्वादिष्ट पराठा आता तयार आहे.
हेही वाचा : Vegetable Paratha Recipe : मिक्स व्हेजिटेबल पराठा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -