Saturday, April 13, 2024
घरमानिनीHealthKids Lunch Box : मुलांना टिफीन मध्ये द्या हे टेस्टी पदार्थ

Kids Lunch Box : मुलांना टिफीन मध्ये द्या हे टेस्टी पदार्थ

Subscribe

प्रत्येक आईला एकच प्रश्न असतो की, शाळेत मुलाला डब्याला काय दिले पाहिजे. मुलाला डब्याला असे काही दिले पाहिजे, जे त्याला आवडेल आणि त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील असेल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्या लक्षात ठेवून तुम्ही त्यांचा लंचबॉक्स अधिक पौष्टिक बनवू शकता.

हेल्दी लंचबॉक्स कसा पॅक करायचा

  • फ्रोझन आणि इन्स्टंट फूड ऐवजी नेहमी ताजे आणि घरगुती अन्नपदार्थ लंचबॉक्समध्ये ठेवा.
  • आजकाल मुलांना जेवणाआधी 10-15 मिनिटांचा ब्रेक असतो, यासाठी त्यांनी एक वेगळा जेवणाचा डबा ठेवावा. यामध्ये पनीर, टोफू, मशरूम असे काही असेल तर आणखीनच चांगले. यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, कोबी, ग्रीन सलाड यांचा समावेश करू शकतो.
  • जर तुमच्या मुलाने पास्ता खाण्याचा हट्ट केला तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि चीज घालून गव्हाचा पास्ता बनवू शकता. चवीसोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
  • प्रेशर कुकरमध्ये शेंगदाणे, वाटाणे, कॉर्न इत्यादी सोबत अंकुरलेले मूग, हरभरा इत्यादी घेऊन एका शिट्टीसाठी 1 चमचा तेलात लहान मुलांच्या आवडत्या मसाल्यात तळून घ्या आणि जेवणाच्या डब्यात ठेवा.
  • उडीद, मुगाच्या डोसा अथवा चविष्ट दिरडी होऊ शकतात. डाळींमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असल्याने अशी दिरडी आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात.
  • मुले शाळेत गेल्यावर तुम्ही त्यांना भरलेले पराठे देऊ शकता. खरंतर मुलांना बटाट्याचे पराठे आवडतात. पण बटाट्यासोबत गाजर, कोबी, फ्लॉवर किंवा चीज मिसळून तुम्ही त्यांच्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पराठा बनवू शकता.
  • जेवणात चव वाढवण्यासाठी साध्या मिठाऐवजी थोड्या प्रमाणात पेरी पेरी मसाला, चाट मसाला, मॅगी मसाला, ओरेगॅनो आणि पिझ्झा सिझनिंग हे भाज्या, सॅलड इत्यादींमध्ये वापरा.
  • गोड पदार्थ आवडणारे असले तर गव्ह्याची लापशी करावी, विविध प्रकारच्या कडधान्याची उसळ, मुगाच्या डाळीची इडली, थालीपीठ आदी प्रकार बनविता येतात. हे करीत असताना मुलांनादेखील घरातूनच पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यांची माहितीदेखील होते.

हे पदार्थ देणे टाळा

बहुतांश पालकांचा आपल्या सोयीने आणि मुलांच्या हट्टापायी शरीराला योग्य नसलेले पदार्थ देऊन वेळ मारण्याकडे अधिक कल असतो. त्यात मॅगी, पोहे, शेंगाचटणी, वेफर्स, कुरकुरे, सॉस-चपाती, जाम-चपाती, चुरमुरे फरसाण, पनीर, चीज असे पदार्थ देतात. हा आहार मुलांच्या पोषणातत्वावर परिणाम करतो. मुलांची योग्य वाढ न होणे, लठ्ठपणा, भूक मंदावणे, बौद्धिक व शारीरिक क्षमता कमकुवत होणे. चुकीचा आहार घेणाऱ्या मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोणत्याही मोसमात व्हायरल इन्फेक्शनचे ते बळी ठरतात. नकळतपणे मुलांचे आरोग्य धोक्यात घातले जाते.

- Advertisment -

Manini