Sunday, May 5, 2024
घरमानिनीHealthहेल्दी फूड म्हणून 'हे' पदार्थ खाणे टाळा

हेल्दी फूड म्हणून ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

Subscribe

वेळेची कमतरता आणि टेस्ट वाढवण्यासाठी बहुतांश लोक अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सचे सेवन करतात. दीर्घकाळ पदार्थ ताजे रहावेत म्हणून प्रीजर्व्हेटिव्हचा वापर केला जातो. मात्र असे पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

फ्लेवर्ड मिल्क किंवा योगर्ट
प्लेन मिल्क आणि योगर्टच्या समान फ्लेवर्ड मिल्क किंवा योगर्ट सुद्धा शरीराला कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी देते. पण त्याचसोबत चॉकलेट, वेनीला आणि स्ट्रॉबेरी सारखे फ्लेवर्स तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढवतात. जे क्रोनिक डिजीजचे कारण ठरते. या व्यतिरिक्त मुलांमध्ये लठ्ठपणा, कॅविटी आणि अन्य हेल्थ समस्यांचे कारण ठरू शकते.

- Advertisement -

पाकिटबंद फ्रुट ज्यूस
ज्यूस प्यायल्याने शरीरातील साखरेचा स्तर अनियंत्रित होतो. खरंतर यामध्ये असेलली अत्याधिक प्रमाणातील साखर आणि प्रिजर्वेटिव्हस ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाला प्रोत्साहन देतात. खरंतर फळांच्या रसात फायबरचे प्रमाण कमी असते. तर फ्रुक्टोजचा स्तर अधिक असतो. जे शरीरात हाय ब्लड शुगर आणि डाइजेस्टिव्ह समस्येचे कारण ठरू शकत. अशातच बाजारात विक्री केले जाणारे फ्रुट ज्यूस ऐवजी फळांचे सेवन करा.

व्हाइट ब्रेड
बहुतांश लोक नाश्तात व्हाइट ब्रेड खातात. मात्र अत्याधिक प्रमाणात या ब्रेडचे सेवन केल्याने शरीरात मधुमेहाचा धोका वाढला जातो. यामध्ये असणारे हाय शुगर कंटेट क्रेविंग्स वाढवतात. या व्यतिरिक्त वेटगेन आणि डिप्रेशनचे ही कारण ठरू शकते. ब्रेडला ब्राउन करण्यासाठी कॅरेमलचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त चव वाढवण्यासाठी यामध्ये फ्रुक्टोस कॉर्न सिरप मिक्स केले जाते. कार्ब्स आणि पोटॅशिअम रिच ब्रेड हेल्थसाठी हानिकारक आहे.

- Advertisement -

बिस्किट आणि कुकीज
बाजारात विक्री केले जाणारे बिस्किट आणि कुकीज काही हेल्थ संबंधित जोखिमांचे कारण ठरू शकते. उपाशी पोटी बिस्किट खाल्ल्याने मेटाबॉलिज्म प्रभावित होतो. या व्यतिरिक्त कुकीजचे सेवन केल्याने शरीरातील ब्लड प्रेशर आणि हाइपोथायरॉइडिज्मचा धोका वाढू लागतो.


हेही वाचा- सकाळचा नाश्ता करणं गरजेचं आहे का?

- Advertisment -

Manini