Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen AI सांगणार तुमच्या किचनमध्ये काय काय संपलय!

AI सांगणार तुमच्या किचनमध्ये काय काय संपलय!

Subscribe

आर्टिफिशियल इंटेलिजेंसने स्वयंपाक घराला एवढे अत्याधुनिक बनिवले आहे. यात एलेक्सा आणि गुगल यासारख्या वॉयस असिस्टेंट एप्लिकेशन स्वयंपाक घरात कामवाली बाईसारखी मदत करतात. या डिजिटल हेल्पच्या माध्यमातून स्वयंपाक घरातील इतर आइटम्सबद्दल सांगायचे झाले, तर चिमनी, कॉफी मशीन आणि अवनला बंद-चालू करण्याचे काम या एप्लिकेशन करतात.

 आता मनगटावर बांधलेले डिवाइस आरोग्यी माहिती आणि अन्न शिवणार

- Advertisement -

स्मार्ट घड्याळाला एआय झोडले असल्यामुळे हे डिवाइस आरोग्याविषय जागरुक असून तुमच्या खाण्याची इच्छा देखील सांगू शकते. आता स्वयंपाकघरात अन्न शिजवू शकेल, अशा इलेक्ट्रिक टूल्सवर काम सुरू आहे आणि जेवण तयार झाल्यावर तुम्हाला मेसेजद्वारे देखील सांगेल की, जेवण तयार झाले आहे. यानंतर तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. एआय हे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला मदत करणार आहेत. कधी जेवण खूप जास्त बनविल्यानंतर ते फेकून द्यावे लागते. पण, तुमच्या गरजेनुसार किती अन्न शिजवायचे आहे, ते देखील स्मार्ट किचनमधील फिक्स एआय तुम्हाला सांगणार आहे.

- Advertisement -

 

आता स्वयंपाक घरातील सामान संपले तर यादी बनविण्याची गरज नाही

तुम्हाला आता भाजी, साखर, मीठ, मिर्ची, मसाले आदी गोष्टींची यादी बनविण्याची गरज नाही. एवढे अत्याधुनिक फ्रिज तयार केले जात आहेत की, दूध संपले, कोथिंबीर, भेंडी यासारख्या गोष्टी संपल्या आहेत. या सर्व गोष्टी बाजारातून आणायच्या आहेत. परंतु, फ्रिजमध्ये टॅमेटो शिल्लक असेल तरी ही किचन एआय डिवाइस तुम्हाला सांगणार आहे.

 

 

डाळी-तांदळात किती प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट, बद्दल देखील एआय माहिती देणार

एआय स्वयंपाक घरात बनविलेल्या पदार्थमध्ये किती व्हिटॅमिन आणि न्यूट्रिएंट्सचे प्रमाण आहे, हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही घरी एकादा पदार्थ बनविले, तर त्यातून तुमच्या शरीराला किती प्रॉटीन, कितना आयरन आणि कार्बोहाइड्रेट मिळणार?, ही सर्व माहिती देणारे सॉफ्टवेअर बनवण्यात आले आहे.

 

आयटी तज्ञांनी एआयवर अवलंबून राहण्याचे धोके सांगितले

आयटी एक्सपर्ट दिनेश भट्टने सांगितले की, शहरात नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. यामुळे जेवण कोण बनविणार, असा प्रश्न त्यांना पडतो. जेवण बनवण्यासाठी कोण मदत करणार आणि काय बनवायचे आहे. स्वयंपाक घरात कोणते सामान संपले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस मददगार म्हणून तुमच्या समोर एआय दाखवित आहेत. परंतु, एआय ही मशीन असून ती खूप महागडी मशीन असणार आहे. एआयही  मशीन पूर्णपणे इंटरनेटवर वापरावर अवलंबून असणार आहे. यामुळे इंटरनेटचा वापर देखील तितकाच वाढेल. तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील हस्तक्षेप होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

 

हेही वाचा – Health care : कापलेल्या फळांवर मीठ किंवा मसाले टाकू नका,पडेल महागात 

- Advertisment -

Manini