घरफोटोगॅलरीPHOTO : दमदार अभिनयाची 55 वर्षे...

PHOTO : दमदार अभिनयाची 55 वर्षे…

Subscribe

बॉलीवूडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे वयाच्या ८० व्या वर्षी देखील मनोरंजन क्षेत्रात चांगलेच सक्रिय आहेत. तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. आजही सर्वाधिक बिझी कलाकार अशी त्यांची ओळख आहे. अशा या शहेनशहाला हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त बिग बींनी स्वतः सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांच्या प्रवासाला 55 वर्षे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने एक खास चित्र तयार करण्यात आलं आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘चित्रपटसृष्टीच्या या अद्भुत विश्वात 55 वर्षे पूर्ण.. ही गोष्ट AI ने मला त्याच्यात अंदाजात समजावून सांगितली’, अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. एआयने तयार केलेल्या या फोटोमध्ये संपूर्ण सिनेविश्व दिसतंय.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. आणि आज त्यांना या क्षेत्रात येऊन 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातीलच काही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा हा आढावा.

आपल्या या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट दिले. सुरुवातीला सलग अपयशही त्यांच्या पदरात पडलं, पण अजिबात नाउमेद न होता, त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. आणि बॉलीवूडचे शहेनशहा अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

‘पा’मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या ‘ऑरो’त तर ते अमिताभ आहे हे आपल्याला ओळखू देखील येत नाही. इतकी समरसून त्यांनी ही भूमिका केली आहे.

बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेता, एकमेव बिग बी’ असं एकाने लिहिलंय. तर ‘अमितजी, तुम्ही यापेक्षाही मोठे कलाकार आहात. सिनेसृष्टीतील तुमचं योगदान अतुल्य आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. बिग बींची मुलगी श्वेता बच्चननेही या फोटोवर ‘लव्ह इट’ (हे आवडलंय) अशी कमेंट केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -