Thursday, May 9, 2024
घरमानिनीRecipeLemon Pickle : तेल मसाला न वापरताच करा लिंबाचे लोणचे

Lemon Pickle : तेल मसाला न वापरताच करा लिंबाचे लोणचे

Subscribe

लिंबाचे लोणचे कोणत्याही ऋतूत बनवता येत. तसेच लिंबाच्या लोणचे ओले,कोरडे,आंब-गोड अशा सगळ्या पद्धतीने बनवतात येते. अशातच सगळ्या लोणच्यामध्ये भरपूर तेल असते. आणि म्हणूनच बरेच माणसं लोणचं खायचे टाळतात. आणि म्हणूनच तुम्ही आता लिंबाच्या सालीचे हे लोणचं बिना तेलाचे आणि मसाल्याचे देखील करू शकतात.

साहित्य

  • 250 ग्रॅम लिंबू
  • 2 टिस्पून पिठीसाखर
  • 25 ग्रॅम काळी मिरी पावडर
  • 25 ग्रॅम मीठ

Lime pickle Stock Photos, Royalty Free Lime pickle Images | Depositphotos

कृती

  • सर्वप्रथम सगळी लिंब घ्या. त्याचा रस काढा आणि हा रस एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
  • आता या सगळ्या लिंबाची साल एकत्र करा.
  • आता एका भांड्यात 25 ग्रॅम काळी मिरी पावडर, 25 ग्रॅम मीठ आणि 2 टिस्पून पिठीसाखर एकत्र करून घ्या.
  • आता हि सगळी मिक्स पावडर हाताने लिंबाच्या सालीत भरा आणि उरलेली सालं काचेच्या बरणीत वरच्या भागात ठेवा.
  • अशातच जर तुम्हाला लिंबाचे लोणचं आणखी जास्त आंबट हवे असल्यास त्यात तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता.
  • हे झाल्यावर लिंबाच्या लोणच्याची बरणी कापडाने झाकून ठेवा.
  • यानंतर हे लोणचे 3 ते 4 दिवस उन्हात ठेवा. तसेच लोणचे छान मुरू द्या.
  • आता ठराविक दिवसानंतर लिंबाचे लोणचे खाण्यास तयार होईल.

हेही वाचा : 

Pudina Chutney Recipe : पावसाळ्यात बनवा हेल्दी पुदिना चटणी

- Advertisment -

Manini