घरलाईफस्टाईलसुकलेल्या लिंबाचा अशाप्रकारे करा वापर....

सुकलेल्या लिंबाचा अशाप्रकारे करा वापर….

Subscribe

आपल्यापैकी अनेकांना अशी सवय असते की ते संपूर्ण आठवड्याचा भाजीपाला एकत्र आण्याचा आणि तो आठवडाभर वापरायचा. जसे की फळे, भाज्या आणि मसाले इत्यादी गोष्टी आपण आणतो. तसेच भाज्या या संपूर्ण आठवड्यात वापरल्या जातात पण लिंबाचा वापर जास्त होत नाही आणि यामुळे ती सुकतात. कालांतराने फ्रिजमध्ये ठेवलेले लिंबू सुकू लागतात आणि आपल्याला ते लिंबू फेकून द्यावे लागतात. पण आता तुम्हाला फेकून देण्याची अजिबात गरज नाही. कारण तुम्ही आता सुकलेल्या ;लिंबाना अनेक अनेक प्रकारे वापररु शकता.

17,000+ Dry Lemon Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

- Advertisement -

1. भांडी धुण्यासाठी वाळलेल्या लिंबाचा वापर करा-

भांडी धुण्यासाठी तुम्ही वाळलेल्या लिंबाचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही, फक्त लिंबू पावडर बनवायची आहे. तसेच लिंबाच्या पाण्यामुळे भांड्याचा चिकटपणा नाहीसा होईल आणि भांड्याना चांगला सुगंध देखील येईल. यामुळे भांडी दीर्घकाळ खराब किंवा काळपट होणार नाहीत.

लिंबाची पावडर कशी बनवायची?

पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये लिंबू घ्या.
नंतर एका ग्राइंडरमध्ये लिंबू टाकून किसून घ्या.
आता ही पावडर एका जारमध्ये ठेवा.
भांडी धुताना भांड्यात लिंबू पावडर घालून भांडी स्वच्छ करून घ्या.
तसेच गॅसचा बर्नर किंवा नॉब स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करा.

- Advertisement -

2. लिंबाने करा गॅस बर्नर आणि नॉब स्वच्छ-

बरेच दिवस नॉब किंवा गॅस साफ केला नाहीतर त्यात घाण जमा होते आणि नॉब जाम होऊ लागतो. अशावेळी त्याचा नटबोल्ट उघडा आणि लिंबाच्या साहाय्याने नॉब स्वच्छ करा आणि नंतर नट बोल्ट घट्ट करा.

स्वच्छता कशी करावी?

सर्वप्रथम मागच्या बाजूने गॅस बंद करा.
आता नॉब्स खूप काळजीपूर्वक काढून टाका.
नंतर त्यात लिंबू पावडर घालून नळाच्या खाली धुवून घ्या.
तसेच एका बाऊलमध्ये व्हिनेगर टाकून स्वच्छ करा.
नंतर त्यांना स्पंज किंवा जुन्या टूथब्रशने हळुवारपणे साफ करू घ्या.
आता पाण्याने धुवून घ्या आणि नंतर नॉब्स पुसून घ्या.
हे झाल्यावर गॅसचे पॅनेल धुवा आणि नॉब्स घट्ट बसवा.


हेही वाचा : जुन्या फाटलेल्या कपड्यांना ‘असे’ करा Reuse…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -