घरउत्तर महाराष्ट्रतब्बल ७३ गोवंशांची सूटका; ओझरमध्ये सुरू होता अवैध कत्तलखाना

तब्बल ७३ गोवंशांची सूटका; ओझरमध्ये सुरू होता अवैध कत्तलखाना

Subscribe

नाशिक : येथील अवैधरित्या कत्तली व विक्रीसाठी आणलेल्या 6 लाख 42 हजार 900 रुपयांच्या ७३ जनावरांची ओझर पोलिसांनी शनिवारी (दि.२२) छापा टाकत सुटका केली. ती जनावरे पिंपळगाव येथील गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. यामध्ये पाच म्हशींचा समावेश आहे.

ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व पिपंळगावचे अशोक पवार यांना अवैधरित्या विक्री व कत्तलीसाठी जनावरे आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी मध्यरात्री ओझर गावातील के. जी. एन. कॉलनीलगत शेटे मळ्याजवळ पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात केजीएन कॉलनी येथे एकबाल अत्तार व कादीर अत्तार यांच्या शेतात गायी व म्हशी कत्तलीसाठी शेताच्या कंपाउंडच्या तारांना बांधून ठेवल्याचे आढळून आले. आलीम ईस्माईल कुरेशी, जुनेद आलीम शेख यांच्या मालकीच्या बंगल्यात पत्र्याचे शेडमध्ये कत्तलीसाठी संशयितांनी संगनमत करुन गोवंश जनावरे कत्तलीसाठी ठेवल्याचे आढळून आले.

- Advertisement -

याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्याचे जितेंद्र बागूल यांनी फिर्याद दाखल केली आहे. नंदू जयराम गांगोडे (रा. ननाशी), एकबाल अत्तार, विजय नंदू गांगोडे, शाहरुख रशीद शेख, अकबर बाबु शेख, खलील शेख कुरेशी, आलीम ईस्माईल कुरेशी, जुनेद आलीम शेख, एकबाल अत्तार, कादीर अत्तार (सर्व रा. ओझर ता.निफाड) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, अशोक पवार सहायक पोलीस निरीक्षक जोशी, विश्वनाथ धारबळे, दीपक गुंजाळ, जितेंद्र बागूल, प्रसाद सुर्यवंशी, राजेंद्र डंबाळे, दीपक निकुंभ, सुनील पगारे, रवींद्र गुंजाळ यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -