घरपालघरअति उष्णतेमुळे लिंबाचा वाढतोय भाव.....!"

अति उष्णतेमुळे लिंबाचा वाढतोय भाव…..!”

Subscribe

यंदाही अशीच स्थिती कायम आहे मार्चपासून लिंबाचे दर सातत्याने वाढत होते.मार्चमध्ये शेकड्यामागे १२५ ते १५० रुपयांदरम्यान लिंबू विकले जात होते.त्यापूर्वीचा दर १०० रुपयेदेखील होता.पण उन्हाळा सुरू होताच आवक कमी झाली आणि दरवाढ सुरू झाली आहे.

मोखाडा:  मोखाडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढल्याने फळांच्या रसाबरोबर लिंबूपाणी, लिंबू सरबतांची मागणी वाढली आहे.त्यामुळे बाजारात लिंबाची ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परिणामी, घाऊक बाजारात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लिंबू १५० ते १७५ रुपये किलोच्या दराने विकले जात आहेत.तर किरकोळ बाजारात एका लिंबासाठी दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहेत.त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचा तोरा वाढत आहे. आता एप्रिल महिना सुरू असून लिंबाचा दर मे संपेपर्यंत तरी हेच चित्र बाजारात असणार असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.त्यामुळे लिंबू खरेदी करताना एक किंवा दोन लिंबू घेऊनच ग्राहकांना समाधान मानावे लागत आहे.लिंबाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची मागणी वर्षभर असते.उन्हाळ्यात ही मागणी अधिक वाढते.या दिवसांमध्ये लिंबाचे सरबत जवळपास घरोघरी बनत असते.त्याचसोबत जेवणातील लिंबाचा वापर देखील वाढतो. परिणामतः पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी दुप्पट होते.यंदाही अशीच स्थिती कायम आहे मार्चपासून लिंबाचे दर सातत्याने वाढत होते.मार्चमध्ये शेकड्यामागे १२५ ते १५० रुपयांदरम्यान लिंबू विकले जात होते.त्यापूर्वीचा दर १०० रुपयेदेखील होता.पण उन्हाळा सुरू होताच आवक कमी झाली आणि दरवाढ सुरू झाली आहे.

 

- Advertisement -

उन्हाळा संपेपर्यंत दर चढलेलाच राहणार

भाजीपाला बाजारपेठेत लिंबाच्या आकारानुसार त्याचा दर ठरतो. एकदम लहान आकाराचे लिंबू असल्यास दहा रुपयांना एक, तर वीस रुपयांना तीन अशा दराने किरकोळ बाजारात विक्री सुरू आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे दर असेच चढलेलेच राहतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

 

दरवर्षी उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. हिवाळ्यात दर कमी असतात, तेव्हा नाशिक तसेच आजूबाजूच्या परिसरातून स्थानिक लिंबू बाजारात येतात.उन्हाळ्यात बाहेरून येणारा माल जरा महाग असतो.त्यामुळे ग्राहकांना दरवाढीचा सामना करावा लागतो.
– विजय कोठेकर,भाजीविक्रेते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -