Monday, April 15, 2024
घरमानिनीRelationshipआजी आजोबांच्या संगतीत राहण्याचे फायदे

आजी आजोबांच्या संगतीत राहण्याचे फायदे

Subscribe

बालपण आनंदी जाण्यात आजी आजोबांचा फार मोठा वाटा असतो. आजी-आजोबांच्या सानिध्यात वाढलेली मुलांची समज ही वेगळी असते. अशी मुले नेहमी आनंदी, फ्रेंडली असतात. पण, हल्ली विभक्त कुटुंबामुळे मुलांचे बालपण हे आजी-आजोबांशिवाय घडत आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला मुले आजी आजोबांच्या संगतीत राहण्याचे काही फायदे सांगणार आहोत.

मुलांना प्रेम मिळते –
आई आणि बाबा दोघेही नोकरी करणारे असतील तर अशावेळी आजी-आजोबांकडून मुलांना भरभरून प्रेम मिळते. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी आजी आजोबांचे प्रेम पुरेसे आहे. आजी आजोबांच्या संगतीत मुलांची वाढ योग्यरीत्या तर होते शिवाय त्यांच्यावर उत्तम संस्कार घडतात. याशिवाय आजच्या बदलत्या जगात तुम्ही कोणाकडेही तुमचे मूल सोडू शकत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या पालकांवर आंधळा विश्वास ठेऊ शकता.

- Advertisement -

मुले भावनिकदृष्ट्या मजबूत होतात –
जेव्हा मुले आजी आजोबांच्या संगतीत वाढतात तेव्हा ती भावनिकदृष्ट्या मजबूत होतात. जेव्हा मुले आजी-आजोबांसोबत बराच वेळ घालवतात तेव्हा त्यांना कोणत्याही भावनिक संबंधित समस्यांना कसे सामोरे जावे हे लक्षात येते. या गोष्टी त्यांना मोठे झाल्यावर फायद्याच्या ठरतात. एका अभ्यासानुसार, आजी आजोबांच्या संगतीत राहणाऱ्या मुलांना एकाकीपणा आणि नैराश्याचा समस्या कमी जाणवतात.

- Advertisement -

पारिवारिक नातलग आणि संबंध मुलांना समजतात –
आजी आजोबांच्या संगतीत मुलांना पारिवारिक नातलग आणि संबंध अधिक चांगल्या रित्या समजतात. मुले आजी-आजोबांशी लवकर कनेक्ट होतात. त्यामुळे ते प्रियजनाबद्दल आपुलकी, आदर, सेवा आणि प्रेम आदी मानवी गुण लवकर विकसित करतात. तसेच आजी-आजोबांमुळे मुलांना कौटूंबिक इतिहास कळतो.

आजी-आजोबांनाही होतो फायदा –
आजी आजोंबांची संगत ही मुलांना आनंदी आणि निरोगी ठेवतेच शिवाय हे आजी आजोबांसाठीही फायद्याचे आहे. वाढत्या वयाबरोबर नैराश्य, विसराळूपणा असे अनेक आजार ग्रासू लागतात. यावेळी नातवंडाची सोबत ही आजी आजोबांचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

 

 


हेही वाचा ; Parenting- हट्टी,मूडी मुलांना कसं हाताळाल?

 

- Advertisment -

Manini