घरमहाराष्ट्रनागपूरlonar lake : लोणार सरोवराला मिळणार जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

lonar lake : लोणार सरोवराला मिळणार जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

Subscribe

नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराला येत्या काळात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तयार केल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर ही माहिती देण्यात आली. यासंदर्भात दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले आहेत. (Lonar Lake Lonar Sarovarala will get the status of World Heritage Site)

हेही वाचा – Jitendra Awhad : अजितदादा आधी शरद पवारांचे ऐकत नव्हते अन् आता पंतप्रधानांचे; आव्हाडांचा निशाणा

- Advertisement -

लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत न्यायालयानेच जनहित याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सुनावणी आज न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालय मित्र अधिवक्ता एसएस सन्याल म्हणाले की, लोणार सरोवरचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याची भारतीय पुरातत्व विभागाची योजना आहे. 2020 मध्ये लोणार सरोवरला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. यानंतर आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर लोणार सरोवर व परिसराचे संवर्धन करणे सोपे होणार आहे.

आज पार पडलेल्या सुनावणीत लोणार सरोवर परिसरातील 15 मंदिरे प्राचीन असून त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. यावेळी सरोवराच्या संवर्धनासाठी विविध विभाग कार्यरत असल्याने त्यांच्यात समन्वय निर्माण करण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, गेल्या सुनावणीत अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने तलावाच्या संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 7 फेब्रुवारीला होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Talathi Final Result 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ ठिकाणी पाहा

उल्कापातामुळे तयार झाले लोणार सरोवर

लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -