Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipलोक चांगुलपणाचा गैरफायदा घेतात? मग आजच बदला या सवयी

लोक चांगुलपणाचा गैरफायदा घेतात? मग आजच बदला या सवयी

Subscribe

मनाने निर्मळ असणारे लोक कुटुंबात, मित्र, मैत्रिणींमध्ये आणि कामाच्या ठिकाणी इतरांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. पण जेव्हा तुम्हाला मदतीची किंवा सपोर्टची गरज असते तेव्हा मात्र गोष्टी बदललेल्या दिसतात. म्हणजेच फक्त तुम्ही नातं हाताळण्याचा प्रयन्त करत आहात आणि दुसऱ्या बाजूने होत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती म्हणजे तुमचा वापर केला जात आहे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जात आहे असे समजा, अशावेळी तुम्ही तुमच्या भल्यासाठी काही सवयी बदलायला हव्यात.

सिक्रेट सांगू नका – वैयक्तिक आयुष्यातील बहुतांश गोष्टी इतरांशी शेअर करायला हरकत नसली तर प्रत्येक गोष्ट, तुमचे सिक्रेट उठसुठ सगळ्यांना सांगत बसू नका. सिक्रेट समजल्यावर समोरचा व्यक्ती तुमचे नुकसान करू शकतो. समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यातून तुमची कमजोरी कळू शकते. त्यामुळे तुमचे सिक्रेट, तुमच्या पर्सनल गोष्टी इतरांसोबत शेअर करू नका.

- Advertisement -

जास्त महत्व देऊ नका – नेहमी कोणाची तरी वाट पाहू नका. अशाने समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्व कमी होते. तो तुम्हाला गृहीत धरू लागतो. नात्यात ती व्यक्ती काही गोष्टींबाबत तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागते. त्यामुळे नात्यात कोणाला जास्त महत्व देऊ नका.

लिमिट ठरवा – कौटूंबिक किंवा मैत्रीत कोणी तुमच्या कितीही जवळ असले तरी तुम्हाला एक मर्यादा ठरवावी लागते. तुमची ही मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता काम नये, हे तुम्ही लक्षात घ्या आणि समोरच्यालाही सांगा. जर तुम्ही हा नियम पाळलात तर कोणीही तुमचा विनाकारण गैरफायदा घेऊ शकणार नाही.

- Advertisement -

विचारल्याशिवाय मदत करू नका – काही जणांची अशी सवय असते की, ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, अर्थात ही सवय उत्तमच आहे. पण, कधीकधी हा मूर्खपणा ठरू शकतो. असे केल्याने लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला सहज मिळालेल्या गोष्टींचे महत्व समजत नाही. त्यामुळे न विचारता मदत करणे टाळा.

स्वतःचे निर्णय स्वतः घ्या – आयुष्यातील महत्वाच्या निर्णयासाठी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर जास्त डिपेंड असाल तर अशा परिस्थितीत तुमचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता अधिक असते. समोरचा व्यक्ती त्याच्या फायदाय्साठी चुकीचा सल्ला देऊ शकतो, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे सर्वांची मत घ्या, पण निर्णय मात्र स्वतःच घ्या.

 

 

 


हेही पहा : Introvert असण्याचे फायदे

- Advertisment -

Manini