Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipValentine Day 2024: तुम्हालाही 'व्हॅलेंटाईन डे' खास करायचाय? मग 'या' जबरदस्त आयडियाज...

Valentine Day 2024: तुम्हालाही ‘व्हॅलेंटाईन डे’ खास करायचाय? मग ‘या’ जबरदस्त आयडियाज पाहा

Subscribe

फेब्रुवारी हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. या महिन्याची जोडपी आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रत्येकजण व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतो. कारण या महिन्यात ‘व्हॅलेंटाईन विक’ (Valentine Week) साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ आणि निमित्ताची गरज नसते असं म्हणतात. पण तरी ‘व्हॅलेंटाईन डे’ ची जागा मात्र खास असते.

हा विक ७ फेब्रुवारीला सुरु होतो आणि १४ फेब्रुवारीला संपतो. ज्यामध्ये प्रत्येक दिवस खास असतो. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ‘रोझ डे’ ने होते. फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमी-युगलांसाठी प्रेमाचा महिना. कपल्स या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट्स आणि इतर अनेक भेट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेकजण आपल्या क्रशला किंवा आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी देखील व्हॅलेंटाईन डे निवडतात.

- Advertisement -

काही जण ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day)ला एकत्र डिनरला जातात आणि एकमेकांना भेटवस्तू देऊन आपला व्हॅलेंटाईन साजरा करतात. पण, या व्यतिरिक्त देखील तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या आनंदाने साजरा करु शकता. तुम्हालाही प्रश्न पडला आहे का? की हा दिवस साजरा कसा करायचा?, तर आज आम्ही तुमच्यासाठी खास आयडियाज घेऊन आलो आहोत. ज्या आयडियाज तुमचा हा दिवस एकदम स्पेशल करण्यास मदत होईल.

पिकनिकला जा
भारतातही रोमँटिक ठिकाणांची कमतरता नाही. तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ तुम्हाला खूप खास करायचा असेल तर तुम्ही पिकनिकला जाऊ शकता. पिकनिकला जाऊन तुमचा हा दिवस एकदम स्पेशल करु शकता. जर तुमच्या जोडीदाराला खूप दिवसांपासून कुठेतरी जायचे असेल तर हा दिवस खूपच स्पेशल आहे. जगभरात अशी खूप ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पिकनिक प्लॅन करु शकता. विशेष म्हणजे हे त्यांच्यासाठी खास गिफ्ट असू शकते.

- Advertisement -

कँडल लाईट डिनर
‘व्हॅलेंटाईन डे’ला तुम्ही कँडल लाईट डिनर नक्कीच प्लॅन करु शकता. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने अनेक रेस्टॉरंट्स कँडल लाईट डिनरचे आयोजन करतात. कँडल लाईट डिनरला तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडते जेवण ऑर्डर करु शकता. यामुळे पार्टनरसोबत एकांतही मिळेल.

शॅापिंगला जा
प्रत्येकाला शॅापिंग करायला खूप आवडते. यावेळी तुमच्या पार्टनरला शॅापिंगला नेऊन आवडते कपडे किंवा शूज देऊ शकता. यामुळे नक्कीच तुमचा पार्टनर खूश होईल.

लॉंग ड्राईव्हवर जा
तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही लॉंग ड्राईव्हचा प्लॅन करु शकता. या दरम्यान तुम्ही तुमच्या मनातले सारे काही बोलू शकता आणि तुम्ही तुमचे मन मोकळे करु शकता. यामुळे तुम्हालाही आणि तुमच्या पार्टनरलाही खूप छान वाटेल.

प्रेमाच्या गोष्टी
तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत प्रेमाच्या गोष्टी करा. त्यांचे तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान आहे, हे त्यांना सांगा. यामुळे तुमच्यातील प्रेम अधिक वाढेल.

- Advertisment -

Manini