घरमहाराष्ट्रAjit Pawar Vs Awhad : कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच, आव्हाडांचा अजितदादांवर...

Ajit Pawar Vs Awhad : कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच, आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामातीदौऱ्यात लोकसभा निवडणुकांसदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, असे शरसंधान अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता केली आहे. त्यावर, ‘कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच,’ असा पलटवार आमदार आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या भाषणात 78 मिनिटे काँग्रेस-नेहरूंवर टीका, राऊतांनी भाजपाला सुनावले

- Advertisement -

बारामतीच्या दौऱ्यावर असताना रविवारी अजित पवार यांनी तेथे आयोजित सभेत बारामती परिसरातील विकासकामांची जंत्रीच वाचून दाखविली आणि याआधारे महायुतीच्या उमेदावाराला मतदान करण्याचे आवाहन केले. काही तुमच्याकडे येतील आणि ही शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करतील… कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत! असे ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी हद्द ओलांडली. आपली उंची ओळखा. कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची, आधी पण वाटतच होती, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली होती.

- Advertisement -

अजित पवार यांनी ट्वीट करत त्याबाबत खुलासा केला आहे. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझे पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढेच म्हणणे होते की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेले आहे, असे सांगत अजित पवार यांनी शरद पवार यांचा अनादर केला नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर, काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हेही वाचा – Rane On Uddhav Thackeray : “भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू”, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा ट्वीट करत अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कशाला करता? असा प्रश्न करून आव्हाड म्हणाले की, शरद पवार यांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. पण आता तुमच्या मनातील तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती, असे आव्हाड यांनी सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -