Wednesday, May 8, 2024
घरमानिनीRelationshipविवाह करण्यापूर्वी नक्की करा प्री मॅरिटल काउंसिलिंग

विवाह करण्यापूर्वी नक्की करा प्री मॅरिटल काउंसिलिंग

Subscribe

सुखी वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये ताळमेळ असणे खूप गरजेचे असते. त्यासोबत पती-पत्नीमधील प्रेम हे त्यांचे नाते अधिक मजूबत करते. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेणे, सन्मान करणे, कामाबद्दल महत्वाकांक्षा आणि लक्ष जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी एकमेकांशी एकनिष्ठ राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते.

 

- Advertisement -

अनेक जोडपी विवाहपूर्वी काही गोष्टींवर मोकळेपणाने बोलणे आवश्यक मानत नाहीत. त्याचबरोबर विवाहानंतर त्यांना अनेक अचडणींचा सामोरे जावे लागते. बहुतेक जोडप्यांसाठी, ते एकमेकांच्या प्रेमात आहेत हे पुरेसे असते. पण हे खरे नाही, कोणत्याही व्यक्तीशी विवाह करण्यापूर्वी, तुम्ही ‘प्री मॅरिटल काउंसिलिंग आणि प्री मॅरिटल कॉन्व्हर्सेशन’ केले पाहिजे, जेणेकरून दोघेंनाही एकमेकांना समजण्यासाठी अनुकूल आहेत. यावर दोघे जण एकमेकांसाठी कम्पेटिबल आहे की नाही हे समजते.

Psychological consultation. Beautiful and happy young couple visiting psychologist for relationship counseling.

विवाह करण्यापूर्वी जोडीदाराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती हव्यात

संवाद

प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची स्वतःची वेगळी पद्धत असते. तणावाच्या परिस्थिती असो, एकमेकांच्या प्रयत्नांचे कौतुक करणे किंवा तुमचा दिवस कसा गेला हे सांगणे असो, या सर्व गोष्टी तुम्ही ज्या व्यक्तीशी विवाह करू इच्छितो त्याच्याशी शेअर करणे महत्त्वाचे असते.

- Advertisement -

पैसा

चांगले आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेमासोबतच पैसाही गरजेचा आहे, हे सर्वांना माहीत आहे. विवाहपूर्वी बोलायचे झाल्यास पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पैशाकडे कसे पाहतो, तुमच्या खर्च करण्याच्या सवयी आणि बचत करण्याच्या प्लॅन काय आहेत. या सर्व गोष्टी एकमेकांना सांगायला हव्यात. आर्थिक बाबींची चर्चा दोघांच्या आयुष्यात उपयोगी पडेल आणि तुमचे भविष्य सुधारण्यास मदत होईल.

धर्म आणि श्रद्धा

अध्यात्मिक असो वा धार्मिक, तुमच्या विश्‍वासाबद्दल आणि तुमच्या जीवनशैलीबद्दल तुमच्या जोडीदारासमोर उघडापणे बोला. बर्‍याच वेळा असे होऊ शकते की तुम्ही दोघेही दोन भिन्न धर्माचे असू शकता. त्यामुळे यासाठी तुमच्या जोडीदाराशी तुमच्या धार्मिक विश्वासाबद्दल मोकळेपणाने बोला, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

इंटिमेसी

तुम्ही तुमच्या जीवनात इंटिमेसीकडे कसे पाहता, तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी सहज आणि अस्वस्थ वाटतात. याविषयी तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला आणि त्यांना तुमचे विचार सांगा.

कुटुंब

विवाहामध्ये मुलागा आणि मुलगी या दोघांचे कुटुंबेही एकत्र येतात. विवाह केवळ दोन व्यक्तींचा नसून दोन कुटुंबे एकत्र येतात, असेही म्हटले जाते. आपल्या कुटुंबांबद्दलही तुम्ही एकमेकांशी बोलले पाहिजे.


हेही वाचा – लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, काय सांगतात तज्ज्ञ

- Advertisment -

Manini