Friday, December 8, 2023
घरमानिनीRelationshipलव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, काय सांगतात तज्ज्ञ

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, काय सांगतात तज्ज्ञ

Subscribe

लग्नाचे नाते हे फार पवित्र मानले जाते. अशातच ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज. या दोन्ही नात्यात विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे अशते. बहुतांश वेळा लोकांच्या मनात हा प्रश्न उपस्थितीत होतो की, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज पैकी कोणता पर्याय बेस्ट आहे. काही लोक असा विचार करतात की, लव्ह मॅरेज मध्ये व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल सर्वकाही कळते. अशातच पुढील आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवणे बोरिंग वाटते. याउलट अरेंज मॅरेज मध्ये पार्टनर आधीपासून एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे भविष्यात जर त्या पार्टनर सोबत पटले नाही तर काय होईल असा ही विचार काहींकडून केला जातो. अशातच लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज यामध्ये काहींचा गोंधळ होतो. आज आम्ही तुम्हाला लव्ह की अरेंज मॅरेज याबद्दल तज्ञ काय म्हणतात हेच सांगणार आहोत. (Love vs Arrange Marriage)

लव्ह मॅरेज-अरेंज मॅरेंज मधील फरक?
लक्षात घ्या की, अरेंज मॅरेज मध्ये परिवाराकडून आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नाते ठरवले जाते. त्यानंतर दोन्ही परिवार भेटतात आणि तेथे त्या दोघांची ओखळ करुन देतात. जर ते दोघ एकमेकांना पसंद पडले तर त्या दोघांचे लग्न लावून दिले जाते.

- Advertisement -

दुसऱ्या बाजूला लव्ह मॅरेज मध्ये आधी दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतात. कालांतराने एकमेकांबद्दलच्या गोष्टी अधिक नव्याने कळू लागतात. जर पार्टनरसोबत सर्वकाही ठिक असेल आणि त्याच्याशी संबंध दीर्घकाळ टिकू शकतात असे वाटत असेल तर लव्ह मॅरेजचा पर्याय निवडला जातो. यामध्ये सर्वाधिक महत्वाची गोष्ट अशी की, कपल्स हे परिवारापेक्षा त्यांना काय वाटते आणि त्यांचे नाते खरंच आयुष्यभर टिकेल का याचा विचार करुन लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे समजून घेतले पाहिजे.

- Advertisement -

लव्ह की अरेंज मॅरेज?
-अरेंज मॅरेज केल्याने परिवाराची साथ मिळते. तसेच भविष्यात जर एखादी समस्या नात्यात उद्भवली तर घरातील मंडळी त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठिंबा देतात.
-अरेंज मॅरेजमध्ये मुलगा किंवा मुलगी एकमेकांना पसंद-नापसंद करु शकतात. अशातच एकमेकांना ओळखण्यासाठी ते वेळ घेतात. त्या दरम्यान एकमेकांच्या आवडी-निवडी काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हा एक उत्तम आणि वेगळा अनुभव असतो. सुरुवातीला घरातील मंडळी सोबत असतात. त्यामुळे आत्मविश्वास ही वाढतो.
-अरेंज मॅरेजमध्ये मुलगा किंवा मुलगी आपल्या ड्रिम मॅरेज बद्दल विचार करत असतील तर ते पूर्ण होऊ शकते. कारण काही वेळेस दोन्ही परिवाराची आर्थिक स्थिती व्यवस्थितीत असेल तर त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
-लव्ह मॅरेजमध्ये पार्टनरला दुसऱ्या पार्टनरचा स्वभाव आधीपासूनच माहिती असते. त्यामुळे लग्नानंतर आपली प्रेयसी किंवा प्रियकर आयुष्यभराचा जोडीदार झाल्याचा आनंद असतोच. पण त्यांची अधिक काळजी सुद्धा घेतली जाते.
-काही लोक लव्ह मॅरेजला आकर्षण असे समजतात. पण लग्नानंतर कळते की, नात्याची डोर थोडा कुठेतरी मागे पडतोय.
-लव्ह मॅरेजमध्ये काही वेळेस परिवाराचे संपूर्ण समर्थन मिळत नाही. त्यामुळे काही चुका सुद्धा पार्टनरकडून केल्या जाऊ शकतात.

तज्ञ काय म्हणतात?
तज्ञ असे म्हणतात की, लव्ह असो किंवा अरेंज यामध्ये एकमेकांवरचा विश्वास फार महत्वाचा असतो. पार्टनरच्या भावनांचा आदर करणे, त्यांना सरप्राइज देणे अशा काही गोष्टी केल्याने नाते अधिक मजबूत होतो. जेव्हा कधी वाद होतील तेव्हा एकमेकांशी बोलणे बंद करण्याऐवजी संवाद साधून त्यावर तोडगा काढला पाहिजे. एकमेकांसोबत क्विलिटी टाइम घालवला पाहिजे. तसेच तक्रारी अधिक करण्यापेक्षा त्यांच्या कलेने सुद्धा काही गोष्टी घेतल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जबाबदाऱ्यांमधून एकमेकांसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे. यामुळे लव्ह असो किंवा अरेंज मॅरेज नाते हे दीर्घकाळ टिकतेच.


हेही वाचा- वयाने मोठ्या पुरुषाला डेट करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

 

- Advertisment -

Manini