वसईः पत्नीच्या हत्येत तुरुंगात असताना पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण वसईतून अटक केली आहे. मोहम्मद जावेद अली हुसेन अन्सारी (२८) असे त्याचे नाव आहे.वसई पूर्वेकडील नवजीवन येथे राहणार्या मोहम्मद अन्सारीने ८ डिसेंबर २०१९ ला पत्नी गुलिस्ता अन्सारी (२२) हिची हत्या केली होती. याप्रकरणी वालीव पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून मोहम्मद अन्सारी तुरुंगात होता. कोरोना काळात तुरुंगातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येत होते. त्यावेळी मोहम्मदलाही पॅरोल मिळाला होता. पॅरोल संपल्यानंतर मोहम्मद पुन्हा हजर न होता फरार झाला होता. फरार झालेला मोहम्मद गेली पाच वर्षे पोलिसांना चकवा देत होता. अखेर वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला मोहम्मद वसई गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा मारला असता तो पोलिसांच्या हाती लागला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सचिन दोरकर, मनोज मोरे, बाळू कुटे, विनायक राऊत आदींच्या पथकाने सापळा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला अटक केली आहे.
पत्नीचा मारेकरी पाच वर्षांनी गजाआड
written By My Mahanagar Team
vasai
तेव्हापासून मोहम्मद अन्सारी तुरुंगात होता. कोरोना काळात तुरुंगातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येत होते.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -