Sunday, June 11, 2023
घर मानिनी Relationship मैत्रिणीशी झालेले भांडण सोडवण्यासाठी 'या' ट्रिक्स येतील कामी

मैत्रिणीशी झालेले भांडण सोडवण्यासाठी ‘या’ ट्रिक्स येतील कामी

Subscribe

असे म्हटले जाते की,जिथे प्रेम आहे तिथे भांडण ही होतात. नाते कोणतेही असो, त्यामध्ये रुसवे-फुगवे येतातच. असेच काहीसे नाते मैत्रीचे असते. ज्यामध्ये कोणत्याही विषयावरुन भांडण होऊ शकते आणि कालांतराने एकमेकांशी बोलणे बंद होते. परंतु मैत्री ही अधिक घट्ट असेल तर बेस्ट फ्रेंन्ड्स एकमेकांपासून अधिक दिवस अबोला धरुन ठेवू शकत नाहीत. आपला ईगो, नाराजी विसरुन स्वत:हून पुढे येतात तेव्हा एकमेकांना सॉरी बोलले जाते. पण खुपच जोरदार भांडण झाले असेल तर ते कसे मिटवायचे याच बद्दलच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-तुमच्यात भांडण कोणत्याही कारणावरुन झाले असेल तर एक पाऊल तुम्ही मागे रहा. म्हणजेच तुमच्यातील इगो बाजूला ठेवून मैत्रिणीशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लहानश्या चुकीमुळे तुमचे नाते मोडू देऊ नका. दोघांनी एकमेकांना समजून माफ करा.

- Advertisement -

-जेव्हा तुमचे भांडण होईल तेव्हा थोडावेळ एकमेकांना स्पेस द्या. आपलं डोकं शांत ठेवा. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही शांत व्हाल तेव्हा भांडण विसरुन जात ते कसे सोडवता येईल याकडे लक्ष द्या. आपल्या मैत्रिणीची सुद्धा बाजू ऐकू घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या.

-चुकलात तर माफी सुद्धा मागा. तुम्ही माफी मागितली म्हणून लहान होणार नाहीत. माफी मागताना मात्र त्यात तुमचा इगो नसला पाहिजे. असा विचार करा यामुळे तुमच्या मैत्रिणीवर त्याचा काय परिणाम होईल. जर तुमची मैत्री फार जुनी असेल तर खरंच मैत्रिणीला सॉरी बोला.

- Advertisement -

-मैत्रित भांडण झाले असेल तर कॉम्प्रोमाइज जरुर करा. तसेच भेटून भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा. तुमची मैत्री पुन्हा कशी आधीसारखी होईल आणि त्यासाठी काय करावे लागेल ते करा पण मैत्री मोडू देऊ नका.


हेही वाचा- नातं मजबूत करण्यासाठी थोड खोट बोलावं लागेल

- Advertisment -

Manini