Sunday, December 10, 2023
घरमानिनीRelationshipअशा प्रकारचे वैवाहिक नाते कधीच टिकत नाही

अशा प्रकारचे वैवाहिक नाते कधीच टिकत नाही

Subscribe

प्रत्येकाला लग्न करण्याची इच्छा असते जेणेकरून वैवाहिक आयुष्य जगता येईल. परंतु कधीकधी या नात्यात काही कारणांस्तव फूट पडू शकते. जेव्हा असे होते तेव्हा आयुष्यभर साथ देणारा पार्टनर तुमच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतो. नात्यात नक्की कोणत्या कारणास्तव फूट पडू शकते याच बद्दल पाहूयात. पण या चुका खरंच वैवाहिक आयुष्यात करणे टाळले पाहिजे.

प्रत्येक गोष्टीत खोट काढणे
असे नवरा-बायको जे नेहमीच एकमेकांच्या व्यक्तिमत्त्व किंवा कामात चुका काढत राहतात. अशातच नात्यात सकारात्मकता राहत नाही. यामुळे असे होते की, रिलेशनशिपवर याचा नकारात्मक परिणाम होतो. अशातच काही काळानंतर दोघे एकमेकांपासून या नात्यातून मुक्त होण्याचा विचार करतात.

- Advertisement -

नात्यात केवळ उपस्थितीती दर्शवणे
वैवाहिक आयुष्यात दोघांची एकमेकांना साथ असणे फार महत्त्वाचे असते. जर एक पार्टनर आपलीच मन मर्जी चालवत असेल किंवा सर्वकाही गोष्टींचे निर्णय एकच पार्टनर घेत असेल तर त्यात कपलच्या नात्याची भावना राहत नाही. असे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवणे मुश्किल होते.

आपल्या फोनवर अधिक लक्ष देणे
एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या फोनवर पार्टनरपेक्षा अधिक लक्ष देत असेल तर त्याचा त्यांच्या नात्यावर वाईट परिणाम होतो. तज्ञ असे म्हणतात की, ही सवय वैवाहिक आयुष्यात तणावाचे कारण ठरू शकते. यावरुन दररोज वाद होऊ शकतात. अशी स्थिती लोकांना नैराश्यात घेवून जाते.

- Advertisement -

पैसे मॅनेज करण्यास सक्षम नसणे
जी लोक असा विचार करतात ज्यांचा पार्टनर पैसे व्यवस्थितीत मॅनेज करू शकत नाही त्यांना आपल्या नात्यात कमीटमेंटची कमतरता जाणवते. या स्थितिच्या कारणास्तव त्यांना नेहमीच अस्थिरता वाटू लागते. या कारणास्तव नात्यात वाद होऊ शकतात.

पैशांचा हिशोब ठेवणे
असे कपल्स जे नेहमीच प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतात, जसे की, आपल्या पार्टनरसाठी आपण किती पैसे खर्च केले आणि त्या बदलत्यात त्यांना काय मिळाले. जर अशी स्थिती असेल तर वैवाहिक आयुष्यात नकारात्मकता अधिक वाढू लागते आणि नाते ऐवढे टॉक्सिक होते त्यात राहणे मुश्किल होते.


हेही वाचा- ‘ही’ आहेत रिलेशनशिप डिप्रेशनची लक्षणं

- Advertisment -

Manini