Thursday, February 22, 2024
घरमानिनीRelationshipValentine Day : एकच दिवस नाही तर, संपूर्ण "व्हॅलेंटाईन वीक" प्रेम करा...

Valentine Day : एकच दिवस नाही तर, संपूर्ण “व्हॅलेंटाईन वीक” प्रेम करा व्यक्त

Subscribe

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. कारण हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हेलेंटाईन डे आणि त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या सेलिब्रेशन मध्ये फुलं, चॉकलेट्स, गिफ्ट्स दिली जातात. सोशल मीडियामुळे हल्ली व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ खूप वाढली आहे. तर तुमचा नवरा किंवा जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्याची ही अनोखी संधी आठवडाभर आहे. व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. त्यापूर्वी आठवडाभर हे सेलिब्रेशन सुरु होतं.

रोझ डे (Rose Day)
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते रोझ डे पासून. रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तुमच्या पार्टनरला लाल गुलाबाचं फुल देऊन व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात करा. सकाळी घाईत असताना तुम्हाला जमलं नाही तरी हरकत नाही. तुमचा किंवा तुमची पार्टनर घरी आल्यावर किंवा तुम्ही ऑफिसमधून येताना मस्त गुलाबाची फुलं आणा. गुलाबाचं फुलं देणं ही प्रेमाची सुरुवात समजली जाते.

- Advertisement -

प्रपोझ डे-(Propose Day)
व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारीला प्रपोझ डे साजरा केला जातो.या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी प्रेम व्यक्त केलं जातं. माझा होशील ना, किंवा माझी होशील ना? असं विचारत साथीदाराकडे प्रेमाची कबुली दिली जाते. त्यासाठी प्रपोझ डे पेक्षा चांगला दिवस कोणता असेल? लग्न झालं असेल तर तुमच्या पतीला प्रपोझ डे च्या दिवशी मस्त गिफ्ट देऊन पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करु शकता.

चॉकलेट डे (chocolate Day)
व्हॅलेंटाईन डे चा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे. हा ९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. चॉकलेट्स हेही प्रेमाचं प्रतिकच मानलं जातं. नात्यात कायमच गोडवा टिकून राहावा, यासाठीचं प्रतीक म्हणून या दिवशी प्रेमीयुगुलं एकमेकांना चॉकलेट देतात.

- Advertisement -

टेडी डे (Teddy Day)
प्रेमात असणाऱ्या अनेकांसाठी टेडी म्हणजे अगदी खास. पहिली वहिली भेटवस्तू म्हणून अनेकांचीच या पर्यायाला पसंती असते. खरंतर टेडी बिअर्स मुलींना जास्त प्रिय असतात. पण तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादं क्युटसं टेडी देऊन प्रेम व्यक्त करु शकता. वेगवेगळ्या रंगाच्या टेडीचा अर्थ वेगवेगळा असतो.

प्रॉमिस डे (Promise Day)
प्रेमात वचनांचं खूप महत्त्व आहे. प्रेमाबद्दल विश्वास देण्यासाठी, आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन प्रॉमिस डे ला दिलं जातं. ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ देण्याची वचनं या दिवशी अनेकजण देतात. मुळात या वचनांमागची भावनाच नात्यांना आणखी दृढ बनवते. प्रत्येक संकटाचा सामना एकत्र करण्याचं वचन पुन्हा एकदा तुमच्या पार्टनरला द्या.

हग डे (Hug Day)
प्रिय व्यक्तीला मारलेली एक साधी मिठीही खूप काही सांगून जाते. मुळात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्या व्यक्तीचं अस्तित्वच महत्त्वाचं असतं. प्रेम व्यक्त करण्याचे अन्य मार्ग आहेतच, पण हग डे च्या दिवशी सकाळी सकाळी तुमच्या पार्टनरला घट्ट मिठी मारा.

किस डे (Kiss Day)
नात्याला एका वेगळ्या वळणावर नेणारा किस डे सुद्धा या व्हॅलेंटाऊन वीकमध्ये साजरा केला जातो. आपल्या जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हजार शब्दांपेक्षाही एक किस जास्त बोलून जातो.

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)
व्हॅलेंटाईन डे म्हणजे १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस असतो. व्हॅलेटाईनच्या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस… 14 फेब्रुवारी! प्रेम करण्याऱ्या व्यक्तीसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा एक स्पेशल दिवस असतो. याचदिवशी तुमच्या पार्टनरला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोझही करु शकता.

- Advertisment -

Manini