Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationshipव्हॅलेंटाईन वीक घरी साजरा करत आहात? पाहा 'हे' रोमँटिक चित्रपट

व्हॅलेंटाईन वीक घरी साजरा करत आहात? पाहा ‘हे’ रोमँटिक चित्रपट

Subscribe

फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी आठवडा, महिना किंवा वर्ष नसले तरी व्हॅलेंटाईन विक हे तुमच्या जोडीदारांना खास वाटण्यासाठी एक सुंदर निर्मित आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच रोमँटिक चित्रपटांचा बोलबाला राहिला आहे. रोमँटिक चित्रपटांनी आजपर्यत प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. आता व्हॅलेंटाईन वीक आला आहे. हा 8 दिवसांचा रोमँटिक आठवडा प्रेमी युगुलांचे नाते अधिक जवळ आणतो आणि ते अधिक घट्ट बनवतो. प्रेमाचा हा दिवस फक्त अविवाहित जोडप्यांसाठीच नाही तर विवाहित लोकांसाठीही खूप विशेष आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाइन वीकमध्ये पाहू शकता.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
आता रोमँटिक चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर डीडीएलजेचं नाव येत नाही असं कसं होईल? हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार रोमँटिक चित्रपटांपैकी हा एक आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी ही अनेकांना या चित्रपटात आवडली होती. या चित्रपटामध्ये राज-सिमरनचा रोमान्स उत्तम प्रकारे सादर करण्यात आला होता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटामध्ये अमरीश पुरीनं देखील काम केलं होतं. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

- Advertisement -

हम आपके हैं कौन
‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला केवळ रोमँटिक चित्रपट म्हणणे चुकीचे ठरेल कारण या चित्रपटात इतरही अनेक सुंदर नाती दाखवण्यात आली आहेत. पण तरीही प्रेम आणि निशाचा ९० च्या दशकातील रोमान्स तुम्हाला खिळवून ठेवण्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही हा चित्रपट तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन वीकमध्येही पाहू शकता.

रहना है तेरे दिल में
‘रेहना है तेरे दिल में’ हाही क्लासिक रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. आर.माधवन आणि दिया मिर्झाचा रोमान्स आणि चित्रपटातील गाणी आजही छान वाटतात. हा चित्रपट तुमची व्हॅलेंटाईन संध्याकाळ अधिक सुंदर बनवू शकतो.

- Advertisement -

वीर-जारा
प्रेम हे फक्त मिळवण्यापुरतेच नाही तर गमावण्याबद्दल देखील असते. प्रेमात प्रतीक्षा आणि खरी उत्कटता असते. या गोष्टींभोवती हा चित्रपट विणलेला आहे. शाहरुख खान आणि प्रिती झिंटाची केमिस्ट्री आणि चित्रपटातील गाणी खूपच सुंदर आहेत.

मोहब्बतें
‘कुछ कुछ होता है’नंतर, शाहरुख खाननं ‘मोहब्बतें’ या रोमँटिक चित्रपटाद्वारे सिद्ध केलं की, बॉलीवूडच्या बादशाह हा ‘रोमान्सचा राजा’ देखील आहे. ‘मोहब्बतें’ या चित्रपटात अभ्यासाबरोबर प्रेम किती महत्त्वाचं आहे, हे दाखवण्यात आलं होतं. आदित्य चोप्रा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ‘मोहब्बतें’ या दोन्ही चित्रपटांचा निर्माता आहे. हा चित्रपट तुमची व्हॅलेंटाईन संध्याकाळ सुंदर बनवू शकतो.

- Advertisment -

Manini