घरमहाराष्ट्रCoastal Road : निवडणुका पक्षांना मजेशीर गोष्टी करायला लावतात, आदित्य ठाकरेंचा सरकारवर...

Coastal Road : निवडणुका पक्षांना मजेशीर गोष्टी करायला लावतात, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 19 फेब्रुवारी रोजी मुंबईतील कोस्टल रोडच्या (Coastal Road) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, याचे काम पूर्ण झालेले नाही. असे असतानाही त्याचे उद्घाटन केले जात असल्याचे सांगत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. निवडणुका पक्षांना मजेशीर गोष्टी करायला लावतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Thackeray group : ‘ही’ गॅरंटी मोदी-शहांच्या राजकारणाने दिली आहे, ठाकरे गटाचे शरसंधान

- Advertisement -

राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोस्टल रोड (दक्षिण दिशेला जाणारा) पूर्ण तयार नसतानाही पुढील आठवड्यात खोके सरकारच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून, जो राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीशिवाय पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार होत आहे. तरीही तो आता अर्धवट अवस्थेत असतानाही केवळ श्रेय घेण्यासाठी खोके सरकार केवळ उद्घाटन करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड अर्थात अटल सेतू 4 महिन्यांपासून तयार होता, परंतु जानेवारी 2024पर्यंत त्याचे उद्घाटन झाले नव्हते, कारण गेल्या वर्षी निवडणुका फारशा जवळ आल्या नव्हत्या. रेल्वेची उरण-खारकोपर लाइन, दिघा रेल्वेस्टेशन आणि नवी मुंबई मेट्रोचीही हीच स्थिती होती. ते तयार असूनही त्यांच्या उद्घाटनासाठी उशीर केला, कारण निवडणुका जवळ आल्या नव्हत्या, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता पुणे विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत गेल्या चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, हा गंभीर श्रेयवादाचा खेळ नागरिक पाहतच आहेत.

हेही वाचा – Danve about CM : वंदे भारत, राम मंदिर या गोष्टी…, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले

असा आहे कोस्टल रोड –

कोस्टल रोड तयार झाल्यानंतर 10 किलोमीटरहून अधिकचा प्रवास अवघ्या 10-12 मिनिटांत करता येईल. कोस्टल रोडची एकूण लांबी 29.2 किलोमीटर असून त्याचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. अशा परिस्थितीत तो बनवल्यानंतर 30 ते 40 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पहिल्या टप्प्यात 10.58 किलोमीटरचा पूल बांधला जात आहे. तर 2.4 किमी लांबीचा सागरी बोगदा बांधण्यात आला आहे. एकूण 13,898 कोटी रुपयांच्या प्रकल्पात आतापर्यंत 9,383 कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

हेही वाचा – Thackeray group about EC : निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -