Wednesday, May 8, 2024
घरमानिनीRelationshipनवरा-बायकोमधील किरकोळ वाद महत्वाचे का?

नवरा-बायकोमधील किरकोळ वाद महत्वाचे का?

Subscribe

ज्या जोडप्यामध्ये वाद होत नाही असे जोडपं सापडणं तसं कठीण आहे. नवरा बायकोमध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. कारण जेव्हा दोन व्यक्ती येतात तेव्हा काही ना काही कारंणावरून वाद होतातच. खरं तर, असे वाद हे जास्त काळ ताणून धरायचे नसतात. त्यावर तत्काळच सोल्युशन काढणे गरजेचे असते. अनेक मानशास्त्रज्ञांच्या मते, नवरा-बायकोमध्ये किरकोळ वाद हे झालेच पाहिजेत कारण अशाने नाते मजबूत होते. कोणत्याही नात्यात हलकेफुलके वाद महत्वाची भूमिका बजावत असतात.

पार्टनरची काळजी दिसून येते –
जर तुम्ही तुमच्या पार्टनरला कोणती चुकीची गोष्ट करण्यापासून अडवत असाल तर अशाने तुमची पार्टनरप्रती असलेली काळजी दिसून येते. जर तुम्ही पार्टनरच्या कोणत्याही वागण्यावर, बोलण्यावर प्रतिक्रिया देत नसाल तर तुमच्या लाईफ पार्टनरला असे सहज वाटू शकते की, तुम्ही त्याची काळजी करत नाही.

- Advertisement -

भावना कळतात –
किती तरी वेळा आपण आपल्या रागावर कंट्रोल करतो आणि आपल्या मनातील भावना लपवून ठेवतो. पण, जेव्हा आपण जास्त प्रमाणात रागात असतो तेव्हा आपल्या मनात लपवून ठेवलेल्या भावना बाहेर येतात. अशाने तुमच्या पार्टनरला तुम्हाला काय त्रास होत आहे याचा अंदाज येतो आणि भविष्यात ते पुन्हा न घडण्याची काळजी पार्टनर घेतो.

- Advertisement -

सकारात्मक परिणाम मिळतात –
जेव्हा कपल्समध्ये कडाक्याचे भांडण होते तेव्हा हळूहळू कपल्स गोष्टी समजून घेत, पार्टनरची बाजू समजून घेऊन झालेल्या वादातून पॉझिटिव्ह परिणांमावर येऊन पोहचतात. त्यामुळे भविष्याची दिशा ठरविण्यासाठी अशा वादविवादाची गरज असते. किरकोळ वादांमुळे नवरा बायकोचे नाते अधिक घट्ट होते.

आपुलकी वाढते –
मानसशास्त्रानुसार, तुम्ही ज्याला स्वतःच्या जवळचे समजता त्याच व्यक्तीशी तुम्ही भांडता. जर नवरा-बायकोमध्ये किरकोळ वाद होत असतील तर याचा अर्थ असा की दोघांनाही एकमेकमेकांसोबत आपुलकी वाटते. नवरा-बायकोमधील किरकोळ वाद हे एका मजबूत नात्याचे लक्षण आहे.

 

 


हेही वाचा : मेसेजवरील भांडणं वाढवतात गैरसमज

 

- Advertisment -

Manini