घरक्राइमठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या; मग केली आत्महत्या, वाचा...

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या; मग केली आत्महत्या, वाचा…

Subscribe

बांधकाम व्यवसायिक असलेले दिलीप साळवे यांनी त्यांची पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर आधी गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. काल शुक्रवारी (ता. 01 ऑगस्ट) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठाणे : गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणावर आलेला आहे. परंतु आता एका बांधकाम व्यवसायिकानेच आपल्या पत्नीची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याने खळबळ उडालेली आहे. बांधकाम व्यवसायिक असलेले दिलीप साळवे यांनी त्यांची पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर आधी गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. काल शुक्रवारी (ता. 01 सप्टेंबर) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Thane construction professional Killed wide then committed suicide)

हेही वाचा – Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, ‘या’ प्रकरणी EDकडून कारवाई

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी हे ठाण्यातील मनीषनगरमधील कुंभार आळीत वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्री या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. परंतु हा वाद इतका विकोपाला गेला की, साळवी यांनी पत्नीवर गोळी झाडली. पत्नीची हत्या झाली हे पाहताच त्यांनी स्वतःवरही गोळी झाडत आपले जीवन संपवले. दिलीप साळवी हे ठाण्याचे माजी महापौर असलेले गणेश साळवी यांचे मोठे बंधू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

सदर घटना घडताच याबाबतची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात देखील उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या दोघांचाही मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून हत्या आणि आत्महत्या नेमकी का करण्यात आली? याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. दिलीप साळवी हे ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसांयिकांपैकी एक होते. ज्यामुळे या घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर या प्रकरणानंतर आता त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -