Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipपार्टनरच्या 'या' अपेक्षा नात्यात ठरतात अडचणी

पार्टनरच्या ‘या’ अपेक्षा नात्यात ठरतात अडचणी

Subscribe

नात्यात एकमेकांकडून अपेक्षा असणे अगदी सामान्य आहे. मात्र, अवास्तव अपेक्षा नात्यावर परिणाम होण्यास किंवा नाते संपुष्टात आणण्यात कारणीभूत ठरू शकते. एकमेकांकडून अतिप्रमाणात अपेक्षा ठेवल्याने नात्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलून घेणे अत्यंत महत्वाचे असते. याशिवाय तुमचा पार्टनर तुमच्या या अपेक्षा पूर्ण करू शकतो की नाही हे जाणून घेणेही महत्वाचे आहे.

अनेक नात्यात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास नात्यावर याचा गंभीर परिणाम होतो. पार्टनर दुखी होतात. त्याचे वेळी, अनेक लोक जेव्हा पार्टनरकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा त्याच्या पार्टनरला दोष देतात आणि दोघांमध्ये भांडणे सुरु होतात. असे केल्याने नात्यावर याचा परिणाम दिसू लागतो. हळूहळू नाते बिघडते आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. आज आपण अशा काही अपेक्षा पाहणार आहोत, ज्या पार्टनरकडून ठेवल्याने नात्यावर याचा गंभीर परिणाम होतो.

- Advertisement -

वेळ देणे –
पार्टनरने आपला सगळा वेळ आपल्यासोबतच घालवावा, असा विचार बहुतेक जण नात्यात करतात. तथापि, तुमच्या या अपेक्षेमुळे तुमचा पार्टनर चिडू शकतो. तुम्हाला कंटाळू शकतो. यासाठी पार्टनरशिवाय तुमचे मित्रमैत्रिणी असणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही काही वेळ त्याच्यासोबत घालविल्याने नात्यात बॅलन्स टिकून राहतो. त्यामुळे पार्टनरचे काम समजून त्याच्याकडून वेळेबाबत अपेक्षा ठेवायला हवी.

महत्वाच्या मुद्यांवर असहमती दर्शविणे –
नात्यात काही महत्वाच्या विषयावर मतभेद असू शकतात आणि दोन भिन्न व्यक्तींचे स्वतःचे वेगवेगळे विचार असू शकतात. अशावेळी, तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचा विचार समोरच्या व्यक्तीवर लादण्याऐवजी आदर आणि स्पष्टतेने शेअर करायला हवा. असे केल्याने नात्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

- Advertisement -

प्राथमिकता –
नातेसंबंधांमध्ये सर्वात मोठी चूक ठरते ती म्हणजे पार्टनरने तुम्हाला पहिले प्राधान्यक्रम द्यावे अशा अपेक्षा ठेवणे. खरं तर, नातेसंबंध कोणत्याही व्यक्तीसाठी महत्वपूर्ण असते. मात्र, बहुतेकदा असेही असू शकते की, पार्टनरला याव्यतिरिक्तही काही गोष्टी महत्वाच्या असतात.

मनातले ओळखणे –
तुम्हाला काय हवे आहे, तुम्ही रागावलेले किंवा दुखी आहात हे न बोलता ओळखणे, तुमच्या पार्टनरने समजून घेणे अशी अपेक्षा करणे नातेसंबंध विषारी बनवू शकते. त्यामुळे अशी अपेक्षा करणे सोडा. जर तुम्हाला तुमचे नाते टिकवायचे असेल तर पार्टनरसोबत स्पष्टपणे बोलायला शिका.

वाईट वाटून घेणे –
एक आदर्श नाते असे नसते जिथे पार्टनरसोबत भांडणे होत नाही. त्याऐवजी, एक आदर्श संबंध असा असतो ज्यामध्ये पार्टनरसोबत भांडणानंतर कसे पटवून द्यावे आणि एकत्र पुढे कसे जायचे हे माहित असते.

 

 


हेही वाचा : ‘ही’ लक्षणे दर्शवतात तुम्ही पार्टनरवर डिपेंडेड आहात

 

 

- Advertisment -

Manini