Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligiousचुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचे दान, कमी होऊ शकते सुख-समृद्धी

चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचे दान, कमी होऊ शकते सुख-समृद्धी

Subscribe

घराच्या सुख-समृद्धीसाठी लोक काही वस्तू दान करतात. यामुळे जीवनात आनंद आणि सौभाग्य प्राप्त होते. पण तुम्हाला माहितेय का दान करणे आपल्याला महागात पडू शकते. जर काही गोष्टींकडे लक्ष दिलात तर तुम्हाला या अडचणींना समोरे जावं लागणार नाही.

दान ही गोष्ट प्रत्येक धर्मामध्ये श्रेष्ठ मानली जाते. सनातन धर्मामध्ये चार युगांतील निरनिराळ्या कर्मांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. असे म्हटले आहे की- सत्ययुगातील तप, त्रेतामधील ज्ञान, द्वापरातील यज्ञ आणि कलियुगातील दान यानेच मनुष्याचे कल्याण होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने जीवनात दान करत राहिले पाहिजे. पण दान करण्याचेही काही नियम आहेत. दान नेहमी भक्तिभावाने व नम्रतेने करावे. तसेच, देणगी शक्य तितकी गुप्त ठेवा. गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. दान केल्यानंतर कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नये. याशिवाय अशा काही गोष्टी आहेत, ज्या व्यक्तीने दान करणे टाळावे.

- Advertisement -

ज्योतिषमान्यतेनुसार दान केल्याने दान प्राप्त होते. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान करणे अशुभ मानले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत.

लोक अनेकदा शनिवारी तेल दान करतात. पण हे तेल शुद्ध असले पाहिजे. म्हणजेच, आपण आधीच वापरले तेल दान करु नये.

- Advertisement -

अन्न आणि पाणी महादान मानले जाते. त्यामुळे गरजू आणि गरिबांना अन्नदान करा आणि अन्नधान्य दान करा. परंतु नेहमी ताजे अन्न दिले पाहिजे. शिळे अन्न कोणालाही दान म्हणून देऊ नका.

धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी देवीच्या मूर्तीचे कधीही दान करू नये. असे केल्याने आपण देवी लक्ष्मीला आपल्या घरातून दूर पाठवतो. त्यामुळे सुख-समृद्धी कमी होते.

संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही दही, दूध दान करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार दही, दूध हे चंद्र आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. संध्याकाळी दही, दूध दान करणं टाळल्याने तुमच्या घरात आशीर्वाद आणि सुख-शांती नांदते.

वास्तूशास्त्रानुसार, संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होत नाही. त्याचबरोबर घरात पैशांच्या समस्या सुरु होतात. म्हणून, उधार घेणे आणि संध्याकाळी पैसे देणे टाळावे. देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. यावेळी तुम्ही कोणाला पैसे दिले तर तुम्ही लक्ष्मीला निरोप देत आहात असा त्याचा अर्थ होतो.

- Advertisment -

Manini