घरक्राइमPune News : विरोधकांच्या टीकेनंतर गृह विभाग अलर्ट मोडवर; पुण्यात कुख्यात गुंडांची...

Pune News : विरोधकांच्या टीकेनंतर गृह विभाग अलर्ट मोडवर; पुण्यात कुख्यात गुंडांची परेड

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्त असताना दमदार कामगिरीमुळे परिचित असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील गुंडावर मोठी कारवाई केली आहे.

पुणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळ्या झाडल्या. त्यानंतर राज्यात गुंडाराज सुरू आहे का? असा सवाल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना केला. तेव्हा होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कुख्यात गुंडाची परेड आज (6 फेब्रुवारी) काढून गुन्हेगारीवर अंकूश ठेवल्या जाणार असल्याचा संदेश या कृत्यातून दिला आहे. (Pune News Home department on alert mode after opposition criticism Notorious gangster parade in Pune)

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्त असताना दमदार कामगिरीमुळे परिचित असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील गुंडावर मोठी कारवाई केली आहे. ती म्हणजे पुणे शहर परिसरात टोळी युद्धाचा सुरू असलेला धुमाकूळ रोखण्यासाठी आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुण्यातील लहान- मोठ्या गुंडांची धिंड काढली. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर आल्याची यातून दिसतेय.

- Advertisement -

गुन्हेगारांच्या परेडमध्ये गजा मारणेसह नीलेश घायवळ

पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर आणि परिसरातील लहान-मोठ्या गुडांची आज परेड काढली. यामध्ये काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी भेट घेतलेला कुख्यात गुंड गजा मारणे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एका फोटोत दिसणारा कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचाही समावेश होता. या दोन कुख्यात गुंडासह पुणे पोलीस आयुक्तालयात 200 ते 300 गुंडांची पोलिसांनी परेड काढली. पुणे शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त Action मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : BJP Vs Congress : ईव्हीएममध्ये काहीतरी रहस्य दडलंय; मोदींच्या ‘त्या’ दाव्यावर काँग्रेसचा मिश्किल टोला

- Advertisement -

गुंडगिरी रोखण्यासाठीच अमितेश कुमारांच्या हाती पुणे

पुणे शहर आणि परिसरात काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. यातच टोळीयुद्धाने तर महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. याच टोळी युद्धात अनेकांचा बळी जात आहे. कारण, काही दिवसापूर्वीच घडलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याकांडाने तर पुण्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं होतं. ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहखात्याने आयुक्त अमितेश कुमार यांच्या हाती पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी दिली आहे. त्याचनुसार आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुंडांना आज आयुक्तालयासमोर बोलावण्यात आले होते आणि त्यांनतर त्या गुडांची परेड काढण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -